जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनीही घेतला सुरक्षेचा आढावा
गुहागर, ता. 24 : शुक्रवारी (ता. 23) रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंदर सिंग आणि पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे तालुक्यातील विविध ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यावरुन चरस सदृष्य पदार्थांची पाकिटे गुहागर पोलिसांच्या हाती लागली असावीत अशी चर्चा सध्या सुरु आहे. Drugs Found Again? on Guhagar’s various Beaches
Drugs Found Again?
दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर अंमली पदार्थ जप्त केल्याची घटना घडल्यानंतर 19 ऑगस्टला गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी कस्टम विभागाने 20 किलो 700 ग्राम चरस जप्त केली होती. आता गुहागर तालुक्यातील विविध समुद्रकिनाऱ्यावर निळ्या रंगाची चरसची पाकिटे मिळून येत आहेत. हे प्रमाण गेल्या चार दिवसात वाढले आहे. त्यामुळे गेले पाच दिवस गुहागर तालुक्यातील गुहागर, वेलदूर, अंजनवेल, असगोली, पालशेत, अडूर, कोंडकारुळ, वेळणेश्वर, तवसाळ आदी ठिकाणी सीमा शुल्क विभागासह गुहागर पोलिसांची गस्त सुरू आहे.
Drugs Found Again?
दरम्यान सोमवारी (ता. 21) वेळणेश्वर समुद्र किनाऱ्यावर, मंगळवारी (ता. 22) दुपारी गुहागर शहरातील वरचा पाट, बाग परिसर, असगोली समुद्रकिनारा आदी भागातून चरस सदृष्य सुमारे 31 पाकिटे सापडल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. या माहितीला गुहागर पोलीसांकडून दुजोरा मिळालेला नाही. मात्र बुधवारी 23 आँगस्टला जिल्हाधिकारी, रत्नागिरी एम. देवेंदर सिंग व पोलीस अधीक्षक रत्नागिरी धनंजय कुलकर्णी यांनी देखील असगोली, गुहागर तसेच वरचा पाट गुहागर या समुद्र किनारी भेट दिली. यावेळी उपस्थित तहसीलदार गुहागर, पोलीस निरीक्षक गुहागर व पोलीस पाटील यांना अमली पदार्थ शोध मोहीम राबविणे बाबत तसेच सुरक्षे संबंधी सूचना दिल्या. त्याचप्रमाणे रत्नागिरीच्या फॉरेन्सिक विभागाची फिरती प्रयोगशाळेची (मोबाईल लॅब) गाडी गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर फिरताना दिसून आली. तसेच निळ्या रंगाची पाकिटे अगर अन्य बेवारस संशयास्पद वस्तू दिसल्यास, सापडल्यास जनतेने तातडीने गुहागर पोलीस ठाण्यामध्ये अथवा त्या गावातील पोलीस पाटील यांच्याजवळ संपर्क साधावा असे आवाहनही पोलीसांतर्फे सामाजिक माध्यमांद्वारे केले जात आहे. त्यामुळे चरस सदृष्य अंमली पदार्थांचा मोठा साठा पोलीसांच्या हाती लागला असल्याची दाट शक्यता आहे. Drugs Found Again?