गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथील डॉ. शशिकांत बेलवलकर यांचे 2 सप्टेंबर 2020 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, चार मुली, भाऊ, पुतणे, सुना, जावई असा परिवार आहे. डॉ. बेलवलकर यांनी गेली 40 ते 45 वर्षे वेळंब गावासह शीर, कोतळूक, पांगारी, पोमेंडी व इतर गावांमध्ये त्यांनी वैद्यकीय सेवा केली. सर्व गावांमध्ये ते गोरगरीबांचे डॉक्टर म्हणून त्यांचा नावलौकीक होता. आलेल्या पेशन्टला चांगली सेवा देणे, त्याला सल्ला देणे तसेच त्या पेशन्टकडे पैसे नसल्यास त्याला उलट तिकीटा करता व गोळ्यांकरिता आपल्याकडील पैसे देत असत. त्यांच्या जाण्याने बेलवलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने शृंगारतळी परिसरातील ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे.