ग्रामदैवतांच्या नव्या मूर्तींसाठी उचलला खारीचा वाटा
गुहागर न्यूजने दिनदर्शिका प्रकाशनाच्या वेळी श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थानला रु. 10 हजारांची देणगी (Donation by Guhagar News) दिली. आई भैरी व्याघ्रांबरीसह मंदिरातील ग्राम दैवतांच्या नव्या मूर्तींची स्थापना करण्याचा संकल्प देवस्थानने केला आहे. या कार्यामध्ये खारीचा वाटा उचलल्याचे यावेळी संचालक मनोज बावधनकर यांनी सांगितले. दिनदर्शिका प्रकाशनानंतर मनोज बावधनकर, मयूरेश पाटणकर आणि गणेश धनावडे यांनी एमएमजी ॲडव्हेंटचा धनादेश देवस्थानचे अध्यक्ष शरद शेटे यांच्याकडे सुपूर्त केला. (Donation by Guhagar News) यावेळी पत्रकारांनी देणगी देण्याचा हा अनुभव निश्चितच कौतुकास्पद आहे. असे सांगत देवस्थानच्या पंच मंडळींनी गुहागर न्यूजच्या संचालकांचे अभिनंदन केले.


गुहागर न्यूजची भूमिका
कोरोनाच्या काळात वृत्तपत्रांची छपाई बंद झाली. त्यावेळी पत्रकार म्हणून लिहिलेल्या बातम्या सर्व पत्रकार आपल्या संपर्कातील सर्वांपर्यंत सामाजिक माध्यमांद्वारे पोचवत होते. या पार्श्र्वभुमीवर गुहागर तालुक्याचे हक्काचे न्यूज पोर्टल असावे असा विचार मनात आला. त्यासाठी आवश्यक शिक्षण घेतले. त्यानंतर गुहागरमधील पर्यटनस्थळे, लोककला, सांस्कृतिक वारसा या सर्वांची माहिती जगासमोर आणण्यासाठी अॅडव्हर्टाइज (Advertise), इव्हेंट (Event) आणि न्यूज (News) हे सुत्र समोर ठेवून आम्ही एमएमजी ॲडव्हेंट या कंपनीची स्थापना केली. याच कंपनीचा उपक्रम म्हणून गुहागर न्यूज सुरु केले. 20 ऑगस्ट 2020 रोजी श्री भैरी व्याघ्रांबरीचे आशिर्वाद घेवून कामाला सुरवात केली.
अल्पावधीतच गुहागर न्यूज इतके यशस्वी झाले की, अवघ्या नऊ महिन्यात एप्रिल 2021 मध्ये गुगल ॲडसेन्सने (Google Adsense) गुहागर न्यूजला जाहिरातींसाठी मानांकन दिले. त्याचवेळी गुहागर न्यूजच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर (You Tube Channel) देखील जाहिरातींसाठी मान्यतेच्या अटी पूर्ण झाल्या.
20 ऑगस्ट 2021 ला वर्धापन दिन म्हणून गुहागरच्या खरे ढेरे भोसले महाविद्यालयाला सहकार्य करत एक महिन्याचा पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course of Journalism) आयोजित केला.
23 ऑक्टोबरला ओघळलेले मोती या प्रा. सौ. मनाली बावधनकर यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात मराठी साहित्य परिषद आणि ज्ञानरश्मी वाचनालयाला साह्य केले. (Publication of Book)
गुहागरमधील पर्यटन स्थळे , लोककला यांना गुहागर न्यूजच्या वेबपोर्टल, युट्युब चॅनलेवर प्रसिध्द केले. अशा पद्धतीने जे सुत्र डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरवात केली त्या सर्व क्षेत्रांना थोडासा न्याय देण्यात गुहागर न्यूजने भूमिका निभावली.
या प्रत्येक कार्यापूर्वी आई भैरी व्याघ्रांबरीचे आशिर्वाद घेतले. त्यामुळे हे देवस्थान म्हणजे आम्हा सर्वांसाठी नतमस्तक होण्याचे, उर्जा घेण्याचे स्थान आहे. त्यामुळेच या देवस्थानच्या कार्याला साह्यभूत होणे हे आमचे कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतून आम्ही ही देणगी देत आहोत. Donation by Guhagar News