पतसंस्था आपल्या दारी दौरा : ७ जून ते ११ जून २०२२ रोजी ३० गावात
रत्नागिरी, ता.14 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी. ही ४२ महिन्याच्या अल्प कालावधीत प्रगतीपथावर असणारी रत्नागिरी जिल्ह्यातील आदर्श पतसंस्था म्हणून ओळखण्यात आली आहे. सलग चार वर्षे ‘अ’ वर्ग राखत पहिल्या वर्षापासून सभासदांना लाभांश देणारी महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था असल्याची माहिती सूत्रांनी दिली. District tour of Kharvi Patsanstha
संस्थेविषयी माहिती देण्यासाठी व सभासदांशी हितगुज करण्यासाठी पतसंस्थेचा जिल्हा दौरा ७ जून ते ११ जून २०२२ रोजी राजापूर, रत्नागिरी, गुहागर व दापोली तालुक्यात एकूण ३० गावात घेण्यात आला होता. या तालुक्यात प्रत्येक सभासदांच्या गावी नियोजित वेळेत सभा घेऊन पतसंस्थेची सद्य स्थिती, भविष्यातील वाटचाल याचबरोबर समाजातील प्रत्येक घटक आर्थिक सक्षम होण्यासाठी पतसंस्था आर्थिक सहाय्य करून समाज उन्नतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सर्व सभांमध्ये सभासदांना सांगण्यात आले. District tour of Kharvi Patsanstha

सात्यत्याने वाढती सभासद संख्या, ठेवी, कर्ज उचल, रिकव्हरी व विनम्रसेवा यामुळे संस्थेचा आर्थिक स्तर उंचावत सातकोटी पन्नास लाखाचे खेळते भांडवल, स्वनिधी १ कोटी १२ लाख, सहा कोटी पन्नास लाख ठेवी, चार कोटी पन्नास लाख कर्जरूपाने वाटप,९५% कर्जवसुली च्या जोरावर संस्था भक्कम स्थितीत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी सांगितले. District tour of Kharvi Patsanstha

पतसंस्थेची चाललेली वाटचाल समाधानकारक असल्याचे सभासदांनी आपले मत व्यक्त केले. भविष्यात समाजातील प्रत्येक घटक या पतसंस्थेचा सभासद होऊन सर्व आर्थिक व्यवहार या पतसंस्थेच्या माध्यमातून करेल असे विश्वासपूर्वक अभिवचन गावचे पाटील, मानकरी, गावप्रमुख यांनी दिले. हा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रवासात भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था व सभेची व्यवस्था करण्यासाठी संस्था समन्वय समिती पदाधिकारी, गावप्रमुख यांचे सहकार्य लाभले. District tour of Kharvi Patsanstha

तर संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी, उपाध्यक्ष सुधीर वासावे, संचालक वासुदेव वाघे, कमलाकर हेदवकर, मदन डोर्लेकर, दिनेश जाक्कर यांनी मार्गदर्शन केले. तसेच दौऱ्यात दिनेश डोर्लेकर, संदिप वणकर, दिप्ती कोलथरकर, रमेश जाक्कर, वैभव पालशेतकर , कृष्णा तांडेल, ध्रुवी लाकडे व अरविंद डोर्लेकर या संचालकांनी सहभाग घेतला. समन्वय समिती सदस्य रोहिदास आडविरकर नूतन सदस्य विवेक खडपे, लक्षुमन सारंग, नारायण पावरी, संतोष पावसकर, विनायक तिमसेकर,सुहास संसारे, विकास दाभोळकर व संजय पावसकर यांनी सहभाग घेतला. सभा व्यवस्थापन संस्थेचे मुख्याधिकारी प्रसाद खडपे, प्रथमा मिरजूळकर व गणेश ढोर्लेकर यांनी केले. District tour of Kharvi Patsanstha
