गुहागर : वाढत्या कोरोनामुळे शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गोरगरीब कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. याची दखल घेत कुणबी युवा संघर्ष समिती वसई- विरार येथील दिपक भरणकर व सचिन जोशी यांच्या पुढाकाराने १०० निराधार महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. या उपक्रमात गुहागर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे सहकार्य लाभले.
Kunabi Yuva Sangharsh Samiti Vasai-Virar’s Deepak Bharankar and Sachin Joshi’s initiative distributed kits to 100 destitute women.
विरार कारगिल नगर, मनवेलपाडा (विरार- पूर्व) विभागातील गरीब व गरजु, व निराधार कुटुंबातील १०० महिलांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटमध्ये तांदुळ, साखर, चहापावडर, मसाला, हळद, कांदे, बटाटे, मसुर डाळ, मुगडाळ, अक्के चणे, मीठ, बिस्कीटे,फेस मास्क, पाण्याची बॉटल याबरोबरच इतर अनेक वस्तूंचा समावेश होता.
यावेळी मनवेलपाडा मधील समाज सेवक विनोद पाटील, माजी नगरसेविका हेमांगी पाटील, समाजसेवक नारायण मांजरेकर, श्रीमती लष्करे, निलेश आचरेकर, श्री. कदम, कुणबी समाजोन्नती संघ वसई शाखेचे अध्यक्ष श्री. गावणकर, तुकाराम रांगळे, पांडुरंग कावणकर, निलेश पालांडे, संतोष नवाले, मनोज डाफळे, वैभव नामोळे, निलेश पालांडे, संतोष कानसे, विवेक डिंगणकर, नंदकुमार केंद्रे, चंद्रकांत पाष्टे, श्री. चांदीवडे, अजित लाखण, संदीप ठोंबरे, महेंद रामाणे, वैभव करंबेळे, कमलेश बाईंग, रमेश शिवगण, संजय मांडवकर आदी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी संतोष नवाळे, प्रभाकर चिबडे, साहील मंगेश डाफले, दिपक वनगुळे, बळीराम भातडे, दिपक भरणकर, सुभाष चांदिवडे, पांडुरंग कावणकर, निलेश पांदे या सर्वांचे सहकार्य लाभले.