आमदार भास्कर जाधव : लोकप्रतिनिधींकडे जावे लागणार नाही इतके सक्षम व्हा
गुहागर, ता. 21 : नव्या नळ पाणी योजेनेतून धोपावे गावाला 365 दिवस मुबलक पाणी मिळेल. असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी धोपावे नळ पाणी योजनेच्या भूमिपुजत समारभांत केले. त्याचवेळी ति गुणवत्तेनुसार बनावी, विनाअडथळा सुरु रहाण्यासाठी एक समिती बनवावी. अशी सूचनाही त्यांनी केली.

आमदार भास्कर जाधव MLA Bhaskar Jadhav) यांच्या हस्ते धोपावेतील नळ पाणी योजनेचे भूमिपुजन करण्यात आले. धोपावे गावाला 35 वर्षांपेक्षा जास्त काळ भेडसावणारी पाण्याची समस्या नव्या पाणी योजनेमुळे संपणार आहे. आमदार भास्कर जाधव यांनी जल जीवन मिशन अंतर्गत या पाणी योजनेला 5 कोटी 34 लाख 54 हजार 112 रुपयांचा निधी मंजुर करुन दिला. योजनेला मंजुरी मिळाल्यावर धोपावेकरांनी आनंदोत्सव साजरा केला. आमदार भास्कर जाधव यांचे आभार मानण्यासाठी कार्यक्रम घेतला. मात्र त्या कार्यक्रमाला आमदार येवू शकले नव्हते. त्यामुळे आज भूमिपुजनाचा जाहीर कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार भास्कर जाधव यांच्यासह या गटाचे जि.प. सदस्य व जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव उपस्थित होते. Dhopave Water scheme
भूमिपुजनानंतरच्या जाहीर कार्यक्रमात बोलताना आमदार जाधव म्हणाले की, मी दिलेला शब्द पूर्ण केला याचा आनंद होतोय. ही योजना सहजासहजी मंजुर झालेली नाही. प्रस्ताव सादर केल्यावर लोकसंख्येचे निकष बदलले. दरडोई खर्च दुप्पट होत होता. या सगळ्या आव्हांनाना जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत आणि मी समर्थपणे सामोरे गेलो. प्रयत्नांच्या पराकाष्ठेनंतर ही योजना मंजूर झाली. Dhopave Water scheme
(पाणी योजनेसाठी आमदारांनी केलेला पाठपुरावा समजून घेण्यासाठी लाल अक्षरातील वाक्यावर क्लिक करा.- पाणी योजनेसाठी आमदार जाधव यांचाही संघर्ष )
योजना चालविण्यासाठी गावाने सक्षम व्हावे
आता गावाची जबाबदारी वाढली आहे. ही योजना चालविण्याचे शिवधनुष्य तुम्हाला पेलायचे आहे. ज्याप्रमाणे पाण्यासाठी एकत्र येवून झगडलात त्याचप्रमाणे योजना यशस्वीरित्या चालविण्यासाठी तुम्हाला एकत्र येवून काम करावे लागेल. संपूर्ण गावाची समिती तयार करा. यामध्ये सर्व पक्षाच्या लोकांना घ्या. योजना उत्कृष्टरित्या बांधली जाईल, क्रियान्वित रहाण्यासाठी काम करा. पुढील 15 ते 20 वर्ष पाण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या दारात उभे रहावे लागणार नाही. इतके सक्षम व्हा.Dhopave Water scheme

काय आहे योजना (Dhopave Water scheme)
जलजीवन मिशन (Jal Jivan Mission Scheme) अंतर्गत मंजुर झालेल्या पाणी योजनेमध्ये धोपावे गावाला मोडकाआगर धरणातून पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी मोडकाआगर धरणाजवळ विहीर बांधण्यात येणार आहे. या विहीरीतील पाणी पंपाने खेचून उंचावर बांधलेल्या टाकीत नेण्यात येईल. टाकीतील पाणी डोंगर उताराचा फायदा घेवून (ग्रॅव्हिटीने) जलवाहीनीद्वारे धोपावे गावापर्यंत येईल.Dhopave Water scheme
दिलेला प्रत्येक शब्द पाळण्याचे काम केले – विक्रांत जाधव
जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव म्हणाले की, आज धोपावेमधील ग्रामस्थांची दसरा आणि दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होत आहे. 2019 मध्ये प्रचारासाठी आलो असताना राधाकृष्णाच्या मंदिरात तुम्हाला सांगितले होते की तुमची नळपाणी योजना नक्की होईल. त्यावेळी तुम्ही अवाक् झाला होतात. परंतु पप्पा या कामाचा पाठपुरावा करत होते. या योजनेसाठी त्यांनी सांगितलेले प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी मी धावपळ करत होतो. प्रयत्न प्रामाणिक होते म्हणून तुमच्या प्रश्र्नांची कधी भिती वाटत नव्हती. अडूर कोंडकारुळची योजना अशाचप्रकारे पप्पांनी पूर्ण केली होती. आजही मी दिलेला प्रत्येक शब्द पाळण्याचे, ती कामे पूर्ण करण्याचे काम मी करत आहे. Dhopave Water scheme
या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती सौ. पूर्वी निमुणकर, पंचायत समिती सदस्य सिताराम ठोंबरे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, विनायक मुळे, इम्रान घारे, उद्योजक राजन दळी, धोपावेतील ग्रामस्थ, महिला आदी उपस्थित होते. Dhopave Water scheme
धोपावे पाणी योजनेशी संबंधित बातम्या वाचा :
धोपावे पाणी टंचाई निर्माण झाल्या आर्थिक, सामाजिक समस्या
35 वर्षांच्या जलसंघर्षाला मिळाला पूर्णविराम
पाणी योजनेसाठी आमदार जाधव यांचाही संघर्ष
आता आमदार भास्कर जाधव यांच्यासोबत रहाणार
जल जीवन मिशन योजना (information in Hindi)
