गुहागर, ता. 13 : गुहागर पोलीस ठाणे याच्या पुढाकारातून सागर सुरक्षा अभियानांतर्गत क्रिक्रेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुका किनारपट्टीवरील 7 गावातील खेळाडू तसेच सागर रक्षक दल, पोलीस मित्र सहभागी झाले होते. Cricket competition by Sea Security
या क्रिक्रेट स्पर्धेमध्ये सागर रक्षक दल, पोलीस मित्र आणि वेलदूर, अंजनवेल, रानवी, गुहागर, असगोली, धोपावे, पालशेत या गावातील काही खेळाडू सहभागी झाले होते. या सर्वांना एकत्र करुन चार स्वतंत्र संघ तयार करण्यात आले. गुहागर येथील पोलीस मैदानात मर्यादित षटकांचे एकदिवस सामने घेण्यात आले. स्पर्धेतील गुणी कलाकारांना गुहागर पोलीस ठाण्यातर्फे गौरविण्यात आले. Cricket competition by Sea Security
सागर सुरक्षा अभियानाचा विषय किनारपट्टीवरील गावात पोचावा. तेथील तरुणांबरोबर सागर रक्षक दल, पोलीस मित्र आणि पोलीस यांचा परिचय व्हावा. संवाद व्हावा. यासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याचे प्रभारी पोलीस निरिक्षक बी. के. जाधव यांनी सांगितले. Cricket competition by Sea Security
तसेच जुन महिन्यात सर्व मच्छीमार आपापल्या गावी परततात. हे लक्षात घेवून किनारपट्टीवरील सर्व गावांचा सहभाग असलेली तालुकास्तरीय पावसाळी हॉलीबॉल स्पर्धा भरविण्याचे नियोजन करत असल्याचेही प्रभारी पोलीस निरिक्षक जाधव यांनी सांगितले. Cricket competition by Sea Security