• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनसेतर्फे गुहागर नगरपंचायतीच्या कोविड योद्ध्यांचा सत्कार

by Ganesh Dhanawade
May 24, 2021
in Old News
16 0
0
मनसेतर्फे गुहागर नगरपंचायतीच्या कोविड योद्ध्यांचा सत्कार
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्थावर अंत्यसंस्कार करणाऱ्या गुहागर नगरपंचायतीच्या कोविड योद्ध्यांचा  गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ़े प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
On the occasion of the birthday of Amit Thackeray, a young leader of MNS, Guhagar Taluka Maharashtra Navnirman Sena honored the Covid warriors of Guhagar Nagar Panchayat who were cremated on the coronagrastha who died during the Corona period.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य, पोलीस व महसूल प्रशासनासोबत गुहागर नगरपंचायतीचे कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. दुसऱ्या लाटेत गुहागर ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये तालुक्यातील अनेक कोरोना बधितांचा मृत्यू होत आहेत. एकाच वेळी 4 ते 5 जणांवर रात्री अपरात्री नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना जीवाची पर्वा न करता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. कधीकधी या कर्मचाऱ्यांना दिवसरात्र झोप सुद्धा मिळत नसल्याचे समोर आले आहे. असे कोविड योद्धे गणेश पावसकर, संतोष कोकरे, मनोज घाडे, महेंद्र कदम, प्रतीक चव्हाण, अक्षय लोखंडे, संजय गावडे, मनोज सुर्वे, समर्थ भोसले आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी या कर्मचाऱ्यांना माजी तालुकाध्यक्ष राजेश शेटे यांच्या निवासस्थानी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी मनसेचे माजी तालुका अध्यक्ष राजेश शेटे, तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर, दिनेश निवाते , संजय भुवड, संकेत खांबे, अखिलेश गुप्ता, सौ. निशा राजेश शेटे, नक्षत्रा राजेश शेटे आदी उपस्थित होते.

Tags: CoronaCorona HospitalCorona In GuhagarCorona Newscorona warriorsCovid Care CentreCovid19GuhagarGuhagar NagarpanchyatGuhagar NewsMaharashtra Navnirman SenaMarathi NewsMNSNews in Guhagarगुहागर नगरपंचायतटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.