जिल्हाधिकारी मिश्रा यांची माहिती
गुहागर : जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. केवळ मेडिकल इमर्जन्सीसाठीच लोकांना घराबाहेर पडता येणार आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची गाडी जप्त केली जाणार आहे. तसेच त्याच ठिकाणी त्यांची कोरोना चाचणी करून पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास त्यांना क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
तसेच विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर कडक फाईन बसवण्यात येणार आहे. किराणा खरेदीसाठी होम डिलिव्हरीचा पर्याय निवडावा आणि जवळच्याच दुकानातून किराणा खरेदी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. प्रत्येकाच्या राशनची जबाबदारी शासनाने घेतली आहे. केवळ मेडिकल इमर्जन्सी साठीच घराबाहेर पडा असे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे.