• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकणातील पूरस्थिती नियंत्रणासाठी महत्वाचे निर्णय

by Mayuresh Patnakar
December 16, 2021
in Maharashtra
16 0
0
राज्य सरकारची याचिका कोर्टाने फेटाळली
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई, दि. १५ :- महाड, चिपळूण, संगमेश्वरसह कोकण विभागात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शहरांचे, गावांचे दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी (Control the Flood situation in Konkan) कोकणातील नदीपात्रातील गाळ, बेटे काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी आज दिले. या कामासाठी आवश्यक निधी जलसंपदा विभागाला तातडीने वर्ग करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यानीं दिल्या.

वेळणेश्र्वरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये 30 ते 60 हजार रुपयांची सवलत

पूरस्थितीवर बैठक

कोकणातील नदीकाठच्या शहरातील पूरस्थितीसंबंधात उपाययोजना करण्यासाठी (Control the Flood situation in Konkan)उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil), ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut), सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant), मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख (Aslam Shekh) , मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure), चिपळूणचे आमदार शेखर निकम (Shekhar Nikam), चिपळूण बचाव समितीचे प्रतिनिधी राजेश वाजे, शाहनवाज शाह आदी मान्यवरांसह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.

गाळाने भरल्या नद्या

कोकणातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. अनेक ठिकाणी गाळाची बेटे तयार झाली आहेत. त्यामुळे नद्यांची वहनक्षमता कमी झाली आहे. कोकणात मूळातच पावसाचे प्रमाण जास्त असते. गेल्या काही वर्षात कोकणाला सातत्याने अतिवृष्टीचा फटका बसत आहे. यामुळे कोकणातील नद्यांच्या काठी पुरस्थिती निर्माण होऊन शहरे, गावातील नागरी वस्त्यांचे, नदीकाठच्या शेतजमिनींचे नुकसान होत आहे. पूरस्थिती निर्माण होवू नये. (Control the Flood situation in Konkan) अतिवृष्टीमुळे वाढणारे पाणी नदीपात्रातून सहज वाहून जावे. यासाठी नदीतील गाळ उपसणे आवश्यक आहे. गाळामुळे तयार झालेली बेटे नष्ट केली, नदीपात्राची खोली वाढल्यानंतर नदीची वहन क्षमता वाढेल. त्यातून नदीकाठच्या गावांचा, शहरांचा पुराचा धोका कमी होईल. याबाबत बैठकीत एकमत झाले.  

उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

कोकणात पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी (Control the Flood situation in Konkan) नद्यांमधील गाळ, बेटे काढण्याचे काम युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी दिल्या. ते म्हणाले की,  जलसंपदा खात्याने तातडीने गाळ काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मोठ्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची खरेदी प्रक्रिया सुरु करावी. यांत्रिक यंत्रणा सज्ज कराव्यात. एकाच वेळी विविध ठिकाणी कामांना वेगाने सुरूवात करावी. त्यासाठी आवश्यक असणारा निधी जलसंपदा विभागाला तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

वाशिष्ठी पुरमुक्त होणार

चिपळूण शहराला असणारा पुराचा धोका टाळण्यासाठी वाशिष्ठी नदीतील गाळ, बेटे काढण्याचे काम तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. हे काम वेगाने आणि सुनियोजित पध्दतीने होण्यासाठी एकाच वेळी अनेक ठिकाणी कामांना सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या कामासाठी आवश्यक असणारा निधी तातडीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. (Control the Flood situation in Konkan)

Tags: Control the Flood situation in KonkanGuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.