पर्यावरणपूरक, पारपंरिक पध्दत; अनेक वर्ष विहीर टिकते
गुहागर, ता. 09 : सिमेंट, गुळ, चुना अशा कोणत्याही पदार्थाचा जोडकामासाठी वापर न करता 60 ते 65 फूट खोल विहीरी बांधण्याचे काम गुहागरमधील नरेश करंदेकर करतात. या पध्दतीला कोरी कलाशी बांधकाम म्हणतात. छत्रपती शिवाजी महारांजांच्या काळात किल्ले देखील याच पध्दतीने बांधले जात असत. Construction of wells in the old fashioned way


आधुनिक काळातील बांधकाम विषयाचे कोणतेही शिक्षण न घेतलेले नरेश करंदेकर यांनी ही पध्दती आत्मसात केली आहे. वरवेली लोहारवाडी रहाणाऱ्या नरेश यांनी कोरी कलाशी पध्दतीचे काम सहदेव करंदेकर यांच्याकडून शिकले. Construction of wells in the old fashioned way


या पध्दतीमध्ये चिरा पाचरीच्या आकाराप्रमाणे तासून तोडी रचनेत बसवतात. त्यामुळे विहिरीच्या भिंतींवर दगड, मातीचा कितीही दाब आला तरी भिंतीचा चिरा आतल्या अंगाला सरकत नाही. विहीरीची भिंत कोसळत नाही. गौल विहीरीचा व्यास तळापासून वरपर्यंत सारखा ठेवण्यात कौशल्य पणाला लागते. चिऱ्याची प्रत्येक रांग एकाच व्यासात उभी रहाताना त्या रांगेतील शेवटचा चिरा संपूर्ण रांगेला घट्ट (लॉक) करतो. या चिऱ्याला चावी म्हणतात. कोणत्याही रांगेची चावी एकाखाली एक येणार नाही याची काळजी घेतली जाते.


कोरी कलाशी पध्दतीच्या फायद्याविषयी नरेश करंदेकर म्हणाले की, हे पारंपरिक पध्दतीचे बांधकाम मजबुत, वर्षानुवर्ष टिकणारे असते. शेकडो वर्षांपूर्वी बनवलेले गडकिल्ले, कमानीच्या आकाराचे दगडी पुल याच पध्दतीने बनविण्यात आले. विहीरीचे बांधकाम कोरी कलाशी पध्दतीने केले तर छोटे, मोठे झरे बुजत नाहीत. त्यातील पाणी चिऱ्यांमधुन पाझरुन विहीरीत साठत रहाते. याउलट अतिपावसामुळे विहीर भरली तर चिऱ्यांमधुन पाझरुन विहीरीबाहेर जाणारे पाणी भुजल पातळी वाढवते. त्याचाही फायदा विहीरीला होतो. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा प्रयत्नही या पध्दतीत होतो. Construction of wells in the old fashioned way


कोरी कलाशी पध्दतीने नरेश करंदेकर यांनी बांधलेल्या विहीरी :
सन 2015 : श्री. प्रदीप नार्वेकर, अडुर, 65 फूट खोली
सन 2015 : सार्वजनिक विहीर मराठवाडी वरवेली, 21 फूट खोली
सन 2016 : श्री. संतोष सांगळे, गुहागर, 27 फूट खोली
सन 2018 : श्री. गजानन दिक्षित, गुहागर, 20 फूट रुंद, 21 फूट खोली
सन 2019 : श्री. सुभाष केसरकर, गुहागर, 27 फूट खोल
सन 2021 : श्री. अमोल शेटे, वेळणेश्र्वर, 61 फूट खोल
चालू असलेले काम
योगेंद्र विचारे (वरवेली) आणि अनिल पवार (उमराठ)
नरेश करंदेकर यांचे सहकारी :
वरवेलीतील राजेश करंदेकर, रमेश शिंदे, दिलीप शिगवण, आशिष चांदोरकर व रविभूषण किर्वे, साखरीआगरमधील प्रभाकर भुते, सौ.पूजा माईन व सौ. संगीता भुते आणि कोतळूकचे वसंत पानवलकर


अमोल शेटे, वेळणेश्र्वर
कलाशी पध्दतीमधील बांधकाम करणारे कारागीरही कमी आहेत. हे बांधकाम सिमेंट, वाळु पेक्षा खर्चिक असते पण टिकावू असते. आपल्या पारंपरिक पध्दतीला प्रोत्साहान मिळावे म्हणून मी या पध्दतीची विहीर बांधली.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे Click करा.