मुख्यमंत्र्यांची घोषणा, चिपळूणच्या महापुरात झाला होता मृत्यू
मुंबई, ता. 03 : गेल्यावर्षी चिपळूणमध्ये आलेल्या महापुरात (Chiplun Flood) अपरांत रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरमधील (Covid Care Center) 8 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता. या रुग्णांच्या नातेवाईकांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रत्येकी ४ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. (CM Announced Financial Help)
चिपळूण शहरातील अपरांत हॉस्पिटलतर्फे गाढवतळावर कोविड केअर सेंटर चालविण्यात येत होते. 21 जुलै 2021 रोजी रात्री आलेल्या महापुरामध्ये (Chiplun Flood) या कोविड केअर सेंटरमध्येच पाणी घुसले. या संपूर्ण भागात महापुराचे पाणी घुसल्याने कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना बाहेर काढणेच अशक्य होते. तरीही 22 जुलैला पाण्याची पातळी कमी झाल्यावर पालशेत ता. गुहागर येथील बंटी नागवेकर या तरुणाने जीव धोक्यात घालून काही रुग्णांना वाचवले. त्याचवेळी तेथील 8 रुग्ण मृत पावल्याचे समोर आले. (8 covid patients dead)
CM Announced Financial Help
या मृत पावलेल्या कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत (financial help) करावी अशी विनंती रत्नागिरीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. या संदर्भात मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CM Care Fund) मधुन विशेष बाब म्हणून महापुरात अडकून मृत्यू झालेल्या 8 कोविड रुग्णांच्या (8 covid patients dead) नातेवाईकांना 4 लाखाची आर्थिक मदत (financial help of 4 Lakhs) करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. महाराष्ट्र शासनाचे उपसचिवांनी याची माहिती 2 जुन 2022 रोजी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना दिली आहे. याबाबत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना पत्र पाठविण्यात आले आहे. मृत करोना रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाखांची मदत (financial help) देण्यास मंजुरी देण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षालाही यासंदर्भातील पत्र पाठविण्यात आले आहे. यापुढील कार्यवाही मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाद्वारे केली जाणार आहे.