दिव्यांगांसाठी व विधवा-विधुरांसाठी ; गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था आयोजित
गुहागर, दि.10 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या (Guhagar Taluka Handicapped Rehabilitation Society) वतीने २० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून. रविवार दि. २७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता संस्थेच्या वरवेली चिरेखाण फाटा येथील कार्यालयात, सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी तसेच विधवा व विधुरांसाठी मोफत राज्यस्तरीय वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. Bride-to-be indicators Meet
तरी राज्यातील सर्व गरजू दिव्यांगांनी तसेच सर्वसामान्य लोकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. वधू – वर सूचक नाव नोंदणी कार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रम स्थळी सकाळी ९.३० वाजल्यापासून सुरू राहणार आहे. Bride-to-be indicators Meet
वधू – वर सूचक मेळाव्यास हजर राहण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, एक फुल साईज फोटो, एक पासपोर्ट साईज फोटो, जन्मपत्रिका, शाळेचा दाखला ही कागदपत्र घेऊन यावे. Bride-to-be indicators Meet
तरी इच्छुकांनी श्री. सुनील मूकनाक 9373945174, 7350832024, श्रीमती मिलन जांभारकर 9096473470, श्री. अनिल कुंभार 7620712887, श्री. प्रवीण मोहिते 7798641935, श्री. प्रकाश अनगुडे 7218697247 यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग, सरचिटणीस श्री सुनील रांजाणे यांनी केले आहे. Bride-to-be indicators Meet
या कार्यक्रमासाठी रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare), चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम (MLA Shekhar Nikam), घरडा केमिकल्स लिमिटेड कंपनीचे युनिट हेड श्री. आर. सी. कुलकर्णी (R. C. Kulkarni), जिल्हा समाज कल्याण अधिकारी अजय शेंडे (District Social Welfare Officer Ajay Shende), चिपळूणचे प्रकाश देशपांडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र आरेकर (NCP taluka president Rajendra Arekar), श्री. गौरव वेल्हाळ आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. Bride-to-be indicators Meet