श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजन; 3 तासांत १०२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
गुहागर, ता. 04 : रत्नागिरीतील टीआरपी येथील अंबर हॉल येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर येथील वैभवीलक्ष्मी ब्लड सेंटरच्या (Vaibhavilakshmi Blood Center) संयुक्त विद्यमाने करण्यात आले. व रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या शिबिरामध्ये 3 तासांत १०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. Blood Donation Camp in Ratnagiri


धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाप्रित्यर्थ आणि बलिदान मासाच्या सांगता कार्यक्रमाचे औचित्य साधून, रत्नागिरीत शुक्रवारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर रत्नागिरीतील टीआरपी येथील अंबर हॉल येथे आयोजित केले होते. या शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. Blood Donation Camp in Ratnagiri


रत्नागिरीतील अनेक रुग्ण कोल्हापूर येथे उपचारासाठी जात असतात. त्या वेळी त्यांना रक्ताचीही गरज भासते. परंतु तिथे रक्तदाते त्वरित उपलब्ध करून देण्यात रत्नागिरीकरांना वेळ लागतो. अशा वेळी तिथल्या संस्थेसाठी रक्तदान करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार राजाराम रोड, कोल्हापूर येथील वैभवीलक्ष्मी ब्लड सेंटरच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान करण्यात आले. या शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. शंभुराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. Blood Donation Camp in Ratnagiri


रत्नागिरीतील शिवभक्तानी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. याप्रसंगी रक्तदान करणाऱ्यांना वैभवीलक्ष्मी ब्लड सेंटरतर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष राकेश नलावडे, अमित नाईक, देवेंद्र झापडेकर, अमित काटे, जयदिप साळवी, प्रणित पालकर, अमेय पाडावे, यश डोंगरे, वैभव पांचाळ, प्रदीप साळवी आदींसह बहुसंख्येने उपस्थित होते. Blood Donation Camp in Ratnagiri