• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुका अपंग संस्थेचा वर्धापन दिन संपन्न

by Mayuresh Patnakar
March 31, 2022
in Guhagar
17 0
0
Anniversary of the Crippled Organization
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राज्यस्तरीय दिव्यांग वधू वर सूचक मेळाव्यास उत्तम प्रतिसाद

गुहागर, ता. 31 : तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने २०व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय दिव्यांग वधू वर सूचक मेळावा दिव्यांग मित्र पुरस्काराचे वितरण व दिव्यांगांना मोफत कृत्रिम साहित्य व व्यवसायासाठी शीतपेटयांचे वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साह संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात अंघ सभासद श्रीन विजया मेत्री हिच्या स्वागत गीताने झाली. राज्यस्तरीय दिव्यांग वधू-वर सूचक मेळाव्याचे उद्घाटन मा. श्री. रिसबुड साहेब, मॅनेजर घरडा केमिकल्स लि. लोटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. Anniversary of the Crippled Organization

या सर्व कार्यक्रम अध्यक्ष म्हणून लोकमान्य टिळक स्मृती वाचनालय, चिपळूणचे कार्याध्यक्ष मा. श्री. प्रकाशजी देशपांडे साहेब उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ इतिहास संशोधक व संस्थापक सल्लागार मा. अण्णासाहेब शिरगावकर, मा. श्री. अशोकजी भुमकुटे, जेष्ठ समाजसेवक चिपळूण, वरवेली गावच्या सरपंच मा. सौ. पूनम रावणंग मॅडम, गुहागर परिसर विकास मंचचे मा. श्री. गौरवजी बेल्हा, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष मा. श्री. अशोकजी जायभाजे, गुहागर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मा. श्री. मंदार गोयथळे, लांजा अपंग संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. गौत्तम सावंत, आजले अपंग संस्थेचे अध्यक्ष व उपसरपंच मा. श्री. मंगेश महाडीक, संस्थेचे सल्लागार मा. श्री. विनायक ओक सर, मा. श्री. प्रकाशबापट आदि मान्यवर उपस्थित होते. Anniversary of the Crippled Organization

कार्यक्रमाच्या प्रसाविक मध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय रावणंग, यांनी दिव्यांगांसाठी राबविलेल्या उपक्रमांची व कार्यक्रमांची माहिती करून दिली. भविष्यामध्ये संस्था काय करणार आहे. त्याचीही माहिती दिली. संस्थेतील सर्व प्रकारच्या दिव्यांगांचा सर्वांगी विकास होण्याच्या दृष्टीने “ दिव्यांग संकुल” होणे गरजेचे आहे. तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी एक सर्वसाधारण सभामंडप आवश्यक असल्याचे सांगितले. Anniversary of the Crippled Organization

Anniversary of the Crippled Organization

राज्यस्तरीय दिव्यांग वधू वर सूचक मेळाव्यासाठी राज्यभरातून ऑनलाईन ११४ दिव्यांगांनी नावनोंदणी केली तर – ऑफलाईन ५२ दिव्यांगांनी नोंदणी करून ते सदर कार्यक्रमास उपस्थित होते. सर्वांची ओळख करून देण्यात आली. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून कै. नागेश धोपावकर मित्र परिवार ट्रस्ट, दाभाडे, पुणे यांच्या वतीने १० व मा. श्री. अमित मिरगावकर यांचेकडून ०२ गरजू व होतकरू दिव्यांगांना स्वतः व्यवसाय करण्यासाठी शीतपेटीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. Anniversary of the Crippled Organization

ज्या दिव्यांगांना घरघंटी व शिलाई मशिनचे वाटप करण्यात आलेले होते. त्यांनी आपण सदरचा व्यवसाय करून कसे यशस्वी झाले याबाबत आपला अनुभव कथन केला. तसेच संस्थेमार्फत यापूर्वी झालेल्या वधू सुचक मेळाव्यात ठरलेल्याच लग्न करून सुखी संसार करणा-या श्री रत्नाकर पाटील व रश्मी पाटील, तसेच अनिल कुंभार या जोडप्यांचा सत्कारही या कार्यक्रमात करण्यात आला. Anniversary of the Crippled Organization

घरडा केमिकल्स लि. लोटे यांना संस्थेला शैक्षणिक साहित्य व २७ दिव्यांगांना रोजगारासाठी घरघंटी व शिलाई मशिन वाटप करून दिव्यांगांना जगण्याची नवीन दिशा दाखविल्याबददल सदर कंपनीचे यनिट हेड .सी. कलकर्णी यांना”दिव्यांग मित्र” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी घरडा कंपनीचे मॅनेजर मा. रिसबुड साहेबांनी सर्वांना सुभेच्छा दिल्या कंपनीमार्फत राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली. तसेच संस्थेतील ज्या सभासदांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे त्यांचे अभिनंदन केले. Anniversary of the Crippled Organization

Anniversary of the Crippled Organization

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना संस्थेचे संस्थापक अण्णा शिरगावकर म्हणाले की, २० वर्षापूर्वी स्थापन केलेली ही दिव्यांगांची संस्था जोमाने वाढविण्याचे काम या संस्थेतील सर्व प्रकाच्या दिव्यांगांनी केलेले आहे. रत्नागिरी जिल्हयात नव्हे तर राज्यात आदर्श ठरावी अशी ही एकमेव संस्था असून ती सतत दिव्यांगासाठी कार्यरत आहे.  या वेळी मा. अण्णासाहेब शिरगावकर यांनी संस्थेला Dr शशिकांत गोविंद गजमल, चिपळूण यांचेकडून रु. १००००/- ची देणगी मिळवुन दिली. चिपळूणचे भुसकुटे साहेबानी संस्थेचे कौतुक केले. सर्व प्रकारच्या सोईनी युक्त अशी ही संस्था जिल्हयात आदर्श आहे. दिव्यांगांनी आपला जोडीदार निवडताना जात, धर्म, चय पाहू नका आज एकमेकांना समजून घेणे सर्वात महत्वाचे आहे, असे विचार मांडले मा. श्री. अशोकजी जायभाजे यांनीही संस्थेच्या कामाचे कौतुक केले. Anniversary of the Crippled Organization

अध्यक्षीय भाषणामध्ये श्री. प्रकाशजी देशपांडे साहेब म्हणाले की, २० वर्षे सतत सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी कार्य करणारी रत्नागिरी जिल्हयातील ही गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था आहे. कोणत्याही शासकीय अनुदानाची अपेक्षा न ठेवता फक्त दिव्यांगांसाठी लोकसहभागातून यांनी अनेक यशस्वी उपक्रम राबविले आहेत. संस्थेची प्रगती अशीच उत्तोरोत्तर होत राहो. तसेच संस्थेच्या ज्या गरजा आहेत, ज्या अडचणी आहेत त्या सोडविण्यसाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे असे मत व्यक्त केले. या संपर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचलन संस्थेचे सल्लागार व गुहागर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री. सुधाकर कावळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सल्लागार व माजी प्राचार्य श्री. प्रकाश बापट सर यांनी केले. Anniversary of the Crippled Organization

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश अनगुडे सर, सरचिटणीस श्री सुनिल रांजाणे, खजिनदार श्री सुनिल मुकनाक, श्री प्रविण मोहिते, श्री. संतोष घुमे, श्री. विनायक जाधव सर, श्री संतोष कदम, श्री. राजेश खामकर, श्री अनिल जोशी, श्री प्रकाश कांवळे, श्री सुनिल जोशी, श्री विजय पाटील, मिनल जाभारकर, गीता पटेकर आदींनी विशेष प्रयत्न केले. Anniversary of the Crippled Organization

Tags: Anniversary of the Crippled OrganizationGuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.