गाज रिसॉर्टतर्फे सुविधा, गुरुवारी (ता. 29) उद्घाटन
गुहागर, ता. 28 : पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर (Palshet Beach) पर्यटकांसाठी जेट स्की द्वारे सागरी साहसी खेळांची सुविधा गाज रिसॉर्ट (ग्रीन गोल्ड कोस्टल रिसॉट) तर्फे सुरु करण्यात येत आहे. या सुविधेचे उद्घाटन गुरुवारी (ता. 29) सायंकाळी करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पर्यटकांचे पाय पालशेतच्या समुद्रकिनाऱ्याकडे वळतील. त्यातून पालशेतमध्येही पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. Adventure game on Palshet Beach
पुण्यातील जीतेंद्र जोशी या उद्योजकाने पालशेत समुद्रकिनाऱ्यालगतच्या डोंगरामध्ये गाज रिसॉर्ट उभे केले आहे. परिसरातील जंगली झाडे न तोडता, सपाटीकरण न करता, रिसॉर्ट बांधण्यासाठी उपलब्ध जागेचा उत्कृष्ट वापर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या रिसॉर्टमधील सर्व मनुष्यबळ स्थानिक आहे. रिसॉर्ट सुरु झाल्यानंतर नियमितपणे पालशेत समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता रिसॉर्ट व्यवस्थापनाद्वारे केली जाते. त्यामुळे पर्यटन विकासाबरोबर पर्यावरण संरक्षण आणि स्थानिकांना रोजगार ही या रिसॉर्टची वैशिष्ट्य आहेत. Adventure game on Palshet Beach
गाज रिसॉर्टने वर्षअखेरीत पालशेतच्या पर्यटन विकासात आणखी भर घातली आहे. सी स्टॉर्म व सी स्पिरिट या दोन नविन जेट स्की द्वारे सागरी साहसी खेळ सुविधा नवीन वर्षाच्या प्रारंभी 29 डिसेंबर 2022 पासून पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरु होत आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या आवश्यक सर्व परवानग्या या सुविधेसाठी मिळाल्या आहेत. या सुविधेमुळे पालशेतमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. रोजगार निर्मिती होईल. अशी अपेक्षा जीतेंद्र जोशी यांनी व्यक्त केली आहे. Adventure game on Palshet Beach