गुहागर : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या संत तुकाराम छात्रालयात प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या शासनमान्य अनुदानित वसतिगृहात सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता ५ वी ते १० वी व त्यापुढील विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
The admission process has started at Sant Tukaram Hostel in the heart of the city. An appeal has been made to the students of class 5th to 10th and above for admission in this government sanctioned hostel for the academic year 2021-22.
प्रवेश अर्ज शाळा/कॉलेज प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वसतिगृहात प्रवेश अर्ज मिळतील याची नोंद घ्यावी. या वसतिगृहात सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी एकूण ५५ विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामध्ये इतरमागासवर्गीय ६५ टक्के, मागासवर्गीय २० टक्के (अनु.जाती/अनु.जमाती), आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय १५ टक्के व दिव्यांग ३ टक्के याप्रमाणे भरावयाचे आहे. सदर छात्रालयात सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्याना प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्याना भोजन, निवास, कपाट, बिस्तारा, बंकबेड, खेळाचे साहित्य, किरकोळ औषधोउपचार इ. मोफत सोय उपलब्ध करून अभ्यासमय वातावरण व खेळासह अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
तरी गरीब, हुशार विद्यार्थ्यानी शालेय निकाल लागताच प्रवेश अर्ज घेऊन आपल्या पालकांसमावेत छात्रालयात हजर रहावे. विद्यार्थ्यानी येताना पास झालेल्या परीक्षेचे प्रगती पुस्तक, जातीचादाखला, उत्पनाचा दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, रहिवाशी दाखला, विद्यार्थ्याचे बँकपासबुक, आयकार्ड साईज फोटो इ. यांच्या दोन झेरॉक्स प्रति आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९४२०१५३५७९, ८४२१०५७६२५ अथवा संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच stc. guhagar@gmail. com या ई-मेल वर संपर्क साधून प्रवेश निश्चित करू शकता.