रत्नागिरी मुंबई विद्यापीठ उप-परीसरात विविध अभ्यासक्रम
रत्नागिरी, ता.01 : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उप-परिसरात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांनसाठी एमएससीच्या रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सदर प्रवेश प्रक्रियेतील प्रथम व द्वितीय फेरी पार पडल्यानंतर शिल्लक असणाऱ्या जागांसाठी स्पाॅट ॲडमिशन सुरू आहे. मर्यादित जागाच शिल्लक आहेत तरी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी मुळ कागदपत्रे घेउन कार्यालयात आल्यानंतरच प्रवेश दिला जाईल. याची विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी. Admission begins for students

एमएससी रसायनशास्त्र (chemistry) विभागासाठी एकूण 60 जागा आहेत. ऑरगॅनिक, ॲनेलेटीकल, फिजीकल तसेच इनऑरगॅनीक रसायनशास्त्र विषयातील स्पेशलायझेशन मध्ये प्रवेश दिला जातो. Admission begins for students
प्राणिशास्त्र (Zoology) विभागामध्ये ओशनोग्राफी स्पेशलायझेशन साठी एकूण 25 जागा आहेत. सदर अभ्यासक्रम विषेशतः सामुद्रिक अभ्यास व फिशींग व फिश प्रोसेसिंग कौशल्याधारित आहे. Admission begins for students

पर्यावरणशास्त्र (Environmental Science) विभाग गेली 20 वर्ष रत्नागिरी उपपरिसरात सुरू आहे. याची प्रवेश क्षमता 20 विद्यार्थी आहे. या विभागाचे वैशिष्ट्य म्हणजे PHD सेंटर उपलब्ध आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं संशोधन केंद्र याठिकाणी उपलब्ध असल्याने प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना याचा जास्त फायदा होतो. Admission begins for students
तिन्ही विभागाची स्वतंत्र्य अशी प्रयोगशाळा आहे. विद्यार्थ्यांची नेट आणि सेट परीक्षेची तयारी देखील करून घेतली जाते. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी यासाठी आविष्कार सारख्या संशोधन स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभाग घेता येतो. सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, उत्कृष्ठ प्राध्यापक वर्ग आणि शिष्यवृत्तीची व्यवस्था रत्नागिरी उपपरिसराने उपलब्ध करून दिलेली आहे. या तीनही अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रोजगाराची संधीही विध्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे. Admission begins for students

तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश निश्चित करावा. व प्रवेश प्रक्रियेसाठी 08550955999, 9619894543 आणि 09665334103 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन उपपरिसराचे संचालक डॉ किशोर सुखटणकर व कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांनी केले आहे. Admission begins for students

