• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्यात कोविड संदर्भात 2 लाख 75 हजार गुन्हे

by Manoj Bavdhankar
October 8, 2020
in Old News
17 0
0
Maharashtra Police
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गृहमंत्री अनिल देशमुख : 29 कोटी 66 लाख रुपयांची दंड आकारणी

(वि.सं.अ.-डॉ. राजू पाटोदकर यांच्या माहितीवरुन)
गुहागर : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार  2 लाख 75 हजार गुन्हे नोंदण्यात आले आहेत. 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झालेत. तर 29 कोटी 66 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली आहे.  तसेच कोरोनाच्या बंदोबस्तावरील 250 पोलीसांचा मृत्यु झाला. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
22 मार्चला संपूर्ण देशात कलम 188 लागू झाले. कोरोनाचे संकट वाढु नये. संसर्ग रोखता यावा. यासाठी सुरवातीला दोनवेळा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत असतानाच त्यांच्यावर हल्ले झाले.  काहीजणांनी संचारबंदीच्या आदेशांचे उल्लंघन केले. अशा विविध घटनांमध्ये राज्यात दि. 22 मार्च ते 3 ऑक्टोबरपर्यंत कलम 188 नुसार 2 लाख 75 हजार 990 गुन्ह्याची  नोंद झाली आहे. त्यावरील कारवाईमध्ये 39 हजार 039 व्यक्तींना अटक करण्यात आली. तर 96 हजार 541 वाहने जप्त केली. यातील विविध गुन्ह्यांसाठी  29 कोटी 66 लाख 18 हजार 532 रु. दंड आकारण्यात आला आहे. या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या 369 घटना घडल्या. त्यामध्ये 898 व्यक्तींना, ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर 96 हजार 541 वाहने जप्त करण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील 225 पोलीस व 25 अधिकारी अशा एकूण 250 पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलीस विभागाचा 100 नंबर  हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  1,13,680 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांना जनतेने सहकार्य करावे. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. त्याचा लाभ पोलीसांनी घ्यावा. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे. असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarTop newsगुहागरगुहागर न्युजटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.