गुहागर ता. 23 : तालुक्यातील शृंगारतळी हायस्कूल येथे गुहागर ग्रामीण रुग्णालयाने घेतलेल्या आरोग्य शिबिराला रुग्णांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या आरोग्य शिबिरामध्ये ३२८ रुग्णांना १७ आरोग्यसेवा, ७ स्पेशलिटी तपासणी व उपचार प्रदान करण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये आशा सेविका यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले. Free Health Fair at Patpanhale High School


या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी नगराध्यक्ष राजेश बेंडल, डॉ. निखिल जाधव (वैद्यकीय अधीक्षक), डॉ गुंजोटे (तालुका आरोग्य अधिकारी), डॉ. बळवंत (बालरोग तज्ञ), डॉ. देशमुख (तळवली वैद्यकीय ), डॉ. होनावरकर (लाईफ केअर हॉस्पिटल तर्फे ) डॉ. खान, डॉ. रेडिज, डॉ. दिलवाले, डॉ. दळवी, डॉ. नदीम, डॉ. परकार, डॉ. हवांद्ये व डॉ. हारेकर, (राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रम) डॉ. पूजा जाधव, डॉ. सुबेध जाधव (सिस्टर इन्चार्ज) अधिपरिचारिका कानडे सिस्टर व नर्सिंग स्टाफ, हिंद लॅबचे कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक,संगणक शिक्षक व डाटा एंट्री ऑपरेटर, हायस्कूलचे व ग्रामीण रुग्णालय गुहागरचे कर्मचारी यांनी आरोग्य सेवा दिली. Free Health Fair at Patpanhale High School


यामध्ये १३२-हेल्थ आयडी, ३- PMJAY गोल्डन कार्ड लाभार्थींना प्रदान केले. शस्त्रक्रिया व उपचार यांचा पुढील लाभ घेण्यासाठी लाइफ केअर रुग्णालय चिपळून येथे ३- स्त्री रोग, २४- मोती बिंदू, ६- कर्करोग, १- हृदयविकार, ५- दंतचिकित्सा, १-कान नाक घसा, ७-जनरल मेडिसिन, १-अस्थीरोग रुग्ण संदर्भित करण्यात आले. ६८ -ECG (कर्डिेओग्राम), एक उच्च रक्तदाब आणि एक हृदयविकार असे तातडीची रुग्ण रुग्णवाहिके द्वारे तात्काळ संदर्भित करण्यात आले. प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे व्यसनमुक्ती मेडिटेशन यावर मार्गदर्शन करण्यात आले. Free Health Fair at Patpanhale High School


या आरोग्य शिबिरामध्ये आशा सेविका यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले. काही रुग्णाला पुढील उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटल मध्ये पाठविण्यात आले.