व्यावसायिकांनी जोडले पक्षीनिरीक्षण, खाडीसफर, खाद्यसंस्कृतीसाखरे बिंदू
गुहागर, ता. 31 : कोकणातील नारळ, पोफळीच्या बागेत राहून अस्सल कोकणी जीवनाचा परिचय, निसर्ग वाचण्याची संधी पर्यटकांना कृषी पर्यटन केंद्रांमध्ये मिळते. त्याचसाठी पक्षीनिरिक्षण, जंगल सफर, कोकणची खाद्यसंस्कृती, खाडी सफर, असे बिंदू कृषी पर्यटनाला जोडले गेलेत. निसर्गाशी एकरुप होण्याचा हा उत्तम पर्याय स्थानिकांनी कृषी पर्यटनद्वारे उपलब्ध करुन दिला आहे. Agri-Tourism that Integrates with Nature


कोकणातील काही शेतकरी, बागायतदार यांनी पर्यटन व्यवसायाला निसर्गाची जोड दिली आहे. येथील कृषी पर्यटन फुलते ते नारळ पोफळी, आंबा काजुच्या बागेत. आपल्या निवासाची व्यवस्थाही बागेतच असते. निवासस्थानी अनेक ठिकाणी वातानुकुलित, आकर्षक खोल्या असतात. निवासस्थानाबाहेरचं जग मात्र अस्सल कोकणातलं असत. नारळी पोफळीच्या बागेत डुंबण्यासाठी हौद वाट पहात असतो. पक्षांच्या किलबिलाट आपण सहजपणे ऐकु शकतो. रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशातील चांदणे पाहू शकतो. रातकीड्यांची किरकिर, अधुनमधून हुंकारणारी हुमण यामुळे धीरगंभीर बनलेले वातावरण अनुभवता येते. कोकणातील खाद्यसंस्कृती मोदक, वडेघाटले, भंडारी पध्दतीचे मटण, ताज्या माशांचे वेगवेगळे पदार्थ आपल्या मागणीनुसार पुरविले जातात. Agri-Tourism that Integrates with Nature


तरीही येथील प्रत्येक कृषी पर्यटन केंद्राची वेगळी खासियत आहे. कोणी आपल्या स्वागतासाठी बैलगाडी पाठवतो. शेणाने सारवलेल्या अंगणात स्वागतासाठी कुत्रा, मांजरांसोबत ससे, कोंबडी आणि तीची पिल्ल तुरूतुरू नाचत असतात. काही व्यावसायिकांनी कृषी पर्यटनाला पक्षी निरिक्षणाची जोड दिली आहे.


कोकणात आपण 30 ते 40 जातीचे पक्षी सहजपणे पाहू शकतो. त्यांची माहिती हे व्यावसायिक देतात. काहीच्या बागेत अनेकविध फुलझाडे, औषधी वनस्पती आहेत. काहीजण आपल्याला दिवसा जंगल सफर घडवितात. या सफरीमध्ये मोर, लांडोर, कोल्हा, पक्षांची घरटी, सरपटणारे प्राणी आपण पाहू शकतो. हे व्यावसायिक पर्यटकांना जंगल वाचण्याचा अनुभव देतात. Agri-Tourism that Integrates with Nature


गुहागर तालुक्यातील खाडीपट्ट्यातील एका व्यावसायिकांने कृषी पर्यटनाला आधुनिकतेची जोड दिली आहे. तेथे कमांडो ब्रिज, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, आदी साहसी खेळांची सुविधा आहे. खाडी सफरीद्वारे मगर दर्शन घडते. हनिमुन कपल्ससाठी रात्री होडीत कॅडल लाईट डिनरची व्यवस्था होते. Agri-Tourism that Integrates with Nature


दापोली तालुक्यात अनेक आयुर्वेदीक वनस्पती आणि दुर्मिळ वृक्षाची लागवड व माहिती देणारे पर्यटन केंद्र आहे. एक व्यावसायिक आंब्याच्या हंगामात मँगो फुड फेस्टीव्हल भरवतो. आंब्याच्या 20 पेक्षा जास्त पदार्थांची चव चाखायला मिळते.
असे विविध बिंदुंनी जोडून कोकणातील कृषी पर्यटन केंद्र जीवनाचा पुरेपुर अनुभव देणारे देण्याचा प्रयत्न करत आहेत. Agri-Tourism that Integrates with Nature

