वैज्ञानिक मॉडेल प्रदर्शनात 52 विद्यार्थ्यांचा सहभाग
गुहागर, दि. 03 : एज्युकेशन सोसायटीचे श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात गुहागर. या महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वेगवेगळेमॉडेल प्रदर्शनात मांडले होते. National Science Day Celebration


या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. सरपोतदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर यांनी स्वकारले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सावंत मॅडम यांनी केले. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गमरे सर तर आभार प्रदर्शन श्रीमती बाने मॅडम यांनी केले. National Science Day Celebration
प्रमुख वक्ते श्री. सरपोतदार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक मॉडेलच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. प्राथमिक व माध्यमिक विभागातून एकूण 52 विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉडेल प्रदर्शनात मांडले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवाजी आडेकर, सुधाकर कांबळे, सौ. सावंत मॅडम, सौ. कनगुटकर मॅडम, सौ. शिंदे मॅडम, कृपाल परचुरे, श्रीम. बाणे मॅडम, श्रीम. करंजवकर मॅडम, दिपक गुरव, श्री. वराडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न झाला. National Science Day Celebration

