गुहागर, दि. 23 : अखिल जांगळेवाडी शाळेने राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेचा मुख्य हेतू म्हणजेच शिवरायांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावेत. तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांचा खालावलेला शैक्षणिक आलेख उंचावून त्यांना प्रोत्साहन मिळावे. Competition the occasion of Shiva Jayanti

या विविधांगी शैक्षणिक स्पर्धेमध्ये आराध्या महेंद्र बोले, आर्या प्रशांत लोखंडे, अथर्व प्रमोद जांगळे, दीक्षा निलेश कुळे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. Competition the occasion of Shiva Jayanti
तसेच विविध स्पर्धेतील चित्रकला स्पर्धेत (अंगणवाडी गटात) – प्रथम क्रमांक आराध्या महिंद्र बोले, द्वितीय क्रमांक लावण्या सुहास धनावडे व साची नितीन घरट, तर तृतीय अंतरा संदेश उदेक व आरुष लोखंडे. तर छ. शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटने व माहिती लिहीणे स्पर्धेत (इयत्ता पहिली ते चौथी गटात) – प्रथम आर्या प्रशांत लोखंडे, द्वितीय आरोही अमोल लोखंडे, तृतीय मिहीर मिलन लोखंडे यांनी प्राप्त केला. तर कोणत्याही किल्ल्याची माहिती लिहिणे व महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या कोणत्याही प्रसंगावर वक्तृत्व सादर करणे (इयत्ता पाचवी ते आठवी गटात) – प्रथम अथर्व प्रमोद जांगळे, द्वितीय पारस निलेश कुळे, तृतीय सिद्धांत चंद्रकांत रेवाळे. आदर्श व्यक्तिमहत्वाबद्दल माहिती लिहिणे (इयत्ता नववी ते बारावी गटात) – प्रथम दीक्षा निलेश कुळे, द्वितीय समृद्धी संदेश लोखंडे, सृष्टी दीपक माटल आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. Competition the occasion of Shiva Jayanti

सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले. Competition the occasion of Shiva Jayanti
शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या शैक्षणिक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रसाद जांगळी, सागर धनावडे, शुभम धनावडे, अमोल लोखंडे, पंकज कुळे, सुचित मालप, संदेश उदेक, तेजस मालप, सर्वेश रेवाळे, वेदांत रेवाळे, पारस कुळे, प्रथमेश साटले, सुशांत साटले, सुमित लोखंडे, सौरभ लोखंडे, सारंग लोखंडे, सागर लोखंडे, निखिल रेवाळे, यश कुळे, वेदांत लोखंडे, सिद्धांत रेवाळे, अथर्व कापडे, कौशल धनावडे, विजय देवाळे, कौस्तुभ बारगुडे, स्वरूप कापडे आदींचे सहकार्य लाभले. Competition the occasion of Shiva Jayanti
या कार्यक्रमासाठी स्वीकृत नगरसेवक विकास मालप, संजय मालप, नगरसेविका स्नेहल रेवाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिता धनावडे, आशा सेविका दीक्षा माटल, मुख्याध्यापिका सौ. आठवले, किरण कला मंडळाचे अध्यक्ष उदय लोखंडे, सुधीर जांगळी, गणपत जांगळी, सुभाष घाडे, नामदेव रामाणे, विजय देवाळे, राज विखारे, योगेश हुमणे, किसन घरट, श्रीधर कुळे, दिनेश देवाळे, राजेश पाष्ठे, विनोद देवाळे आदी उपस्थित होते. Competition the occasion of Shiva Jayanti

