गुहागर पोलीसानी घेतली तातडीने दखल
गुहागर, दि. 21 : तालुक्यातील काताळे ग्रामपंचायत क्षेत्रातील तवसाळ काशिवंडे समुद्रकिनारी दुचाकी गेल्या आठ दिवसांपासून उभी आहे. या बेवारस दुचाकीमुळे उलटसुलट चर्चा सुरू आहेत. Unknown Bike on Beach

तवसाळ काशिवंडे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची व स्थानिक निसर्गप्रेमींची वर्दळ असते. याठीकाणी किना-या लगतच असणाऱ्या स्पर्श वडापाव सेंटर नजीकच ही दुचाकी उभी करून ठेवण्यात आली आहे. याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. गुहागर पोलीस स्थानकाचे निरीक्षक बी. के. जाधव यांनी या गोष्टीची तात्काळ दखल घेतली. आपल्या कर्मचाऱ्यांना चौकशी करण्याचे तातडीने आदेश त्यांनी दिले आहेत. Unknown Bike on Beach
मागील ८ दिवस उभी करून ठेवलेली ही दुचाकी चोरीची असु शकते. या दुचाकीचा वापर बेकायदेशीर कृत्यांसाठी केलेला असु शकतो. किंवा या दुचाकीमध्ये धोकादायक ज्वलनशील स्फोटक वस्तुसुद्धा ठेवलेल्या असु शकतात. या शक्यतांची उत्तरे पोलीस तपासामध्ये मिळू शकतील. Unknown Bike on Beach