तरुणीने केले छळवणूकीसह अब्रुनुकसानीच्या धमकीचे आरोप
गुहागर, ता. 17 : मिरा भाईंदर वसई विरार जिल्ह्यातील तुळींज पोलीसठाण्यात एका युवतीने शृंगारतळीतील तरुणाविरुध्द फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये हा तरुण छळवणूक करतो. अब्रुनुकसानीच्या धमक्या देतो. पाठलाग करतो. असे आरोप करण्यात आले आहेत. Complaint of a young woman
मिरा भाईंदर वसई विरार जिल्ह्यातील तुळींज पोलीसठाण्यात16 फेब्रुवारीला एका युवतीने फिर्याद दाखल केली आहे. ही मुलगी गुहागर तालुक्यात रहाणारी असून सध्या वसई विरार परिसरात रहाते. Complaint of a young woman
तिने दिलेल्या तक्रारीनुसार शृंगारतळीतील प्रसाद कुष्ठे या तरुणाला तक्रारदार युवती भाऊ मानत होती. मात्र प्रसाद तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. प्रेमाचे नाते युवतीला मान्य नव्हते. म्हणून प्रसादला ति टाळत होती. 2020 मध्ये या तरुणीसाठी आईवडिल स्थळ शोधत असताना, एकतर्फी प्रेम असलेल्या प्रसादने हीची वर्तणुक खराब आहे, अनेक मुलांशी लफडे आहे, असे खोटेनाटे आरोप करुन लग्न ठरविण्याच्या कार्यक्रमामध्ये बाधा आणली. तेव्हापासून प्रसाद कुष्ठेशी तिने बोलणे बंद केले. Complaint of a young woman
12 जानेवारी 2022 पासून प्रसाद मोबाईलवर शिव्यांचे संदेश पाठवतो. डालींग तू फसवणारी मुलगी आहेस असे इन्स्टाग्रामला फोटो टाकतो, तुला बरबाद करने. अशा धमक्या देतो. अश्लिल संदेश पाठवून नाहक त्रास देतो. 29 जानेवारी 2022 ला ही युवती गावी आली असताना प्रसाद कुष्ठे याने गावाती लोकांमध्ये बदनामी केली. त्यामुळे तणावाखाली असल्याचे या युवतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच प्रसाद कुष्ठे ऑनलाईन लोकेशन तपासून पाठलाग करीत असल्याचा आरोपही तिने तक्रारीत केला आहे. Complaint of a young woman
या सर्व गोष्टी या युवतीने आईवडील आणि भावाला सांगितल्या होत्या. त्यावेळीच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याविषयी सांगितले. परंतू भितीपोटी या युवतीने तक्रार केली नाही. Complaint of a young woman
या फिर्यादीवरुन तुळींज पोलिसांनी प्रसाद कुष्ठेविरुद्ध कलम 501, 506 आणि 354 डी नुसार गुन्हा दाखल केला आहे. Complaint of a young woman
