आ. भास्करराव जाधव, वर्गणी काढून कामं करण्याची वेळ येवू देणार नाही
गुहागर : आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या माध्यमातून तालुक्यात झालेला आणि झपाट्याने होत असलेला सर्वांगिण विकास पाहून प्रेरित झालेल्या तालुक्यातील खोडदे गावातील भाजपच्या शेकडो कार्यकर्ते व समर्थकांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. Bjp workers in khodade join Shiv Sena. या सर्वांचे पक्षामध्ये स्वागत करताना आमदार श्री. जाधव यांनी विकासाची चिंता तुम्ही करू नका, ती जबाबदारी आता माझी. असा शब्द देवून सर्वांनी मिळून एकत्र काम करूया, असे आवाहन केले.
BJP workers in Khodade join Shiv Sena
खोडदे गावातील गोणबरेवाडी, निवातेवाडी नं. १, मधली डिंगणकरवाडी येथील स्थानिक आणि मुंबई मंडळाच्या सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार श्री. जाधव यांच्या चिपळूण येथील संपर्क कार्यालयात येवून त्यांच्या हस्ते या सर्वांनी खांदयावर भगवा पटका घेतला. प्रवेशकर्त्यांमध्ये गोणबरेवाडी मधील ग्रामीण मंडळाचे किसन गोणबरे, प्रकाश गोणबरे, यशवंत गोणबरे, अनंत गोणबरे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रदीप गोणबरे, रविलाल गोणबरे, विलास गोणबरे, नितीन गोणबरे, अनिल गोणबरे, सचिव रामदास गोणबरे, मधली डिंगणकरवाडीमधील चंद्रकांत डिंगणकर, कृष्णा डिंगणकर, सुहास डिंगणकर, दिनेश डिंगणकर, संदेश डिंगणकर, नितीन डिंगणकर, सौ. नंदीनी डिंगणकर, नितीशा डिंगणकर, सुरेखा डिंगणकर, वंदना डिंगणकर, दिप्ती डिंगणकर, निवातेवाडी नं. १ मधील स्थानिक अध्यक्ष विजय निवाते, सचिव शांताराम निवाते, कृष्णा निवाते, अनंत निवाते, मुंबई मंडळाचे अध्यक्ष मोहन निवाते, उपाध्यक्ष प्रभाकर डिंगणकर, प्रकाश निवाते, गणेश निवाते आदी प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. BJP workers in Khodade join Shiv Sena
शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी या सर्व प्रवेशकर्त्यांनी आमदार श्री. जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, आम्ही कायम भाजपच्या पाठिशी राहिलो, पण आष्वासनांच्या पलिकडे आमच्या पदरात काहीच पडले नाही. परिणामी, आम्ही विकासापासून वर्षानुवर्षे वंचित राहिलो. गेल्या दहा-बारा वर्षात आपण मतदारसंघात करीत असलेले काम आम्ही पाहत आहोत. आमच्या गावात कोटयवधींची कामे आपल्या माध्यमातून झाली. परंतु, इतकी वर्षे प्रामाणिकपणे भाजपच्या पाठिशी राहूनदेखील आमचा विकास होवू शकला नाही. उलट, वर्गणी काढून, स्वतःच्या खिशाला चाट देवून छोटी-मोठी कामे आम्हाला करावी लागली.
यावर आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी ‘आपण उशिरा का असेना पण योग्य निर्णय घेतला आहात. यापुढे ही वेळ मी आपल्यावर येवू देणार नाही’, असा शब्द देवून पुढील आर्थिक वर्षात विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.BJP workers in Khodade join Shiv Sena
यावेळी तालुकाप्रमुख श्री. सचिन बाईत, उपतालुकाप्रमुख काशिनाथ मोहिते, तालुका चिटणीस विलास गुरव, सहचिटणीस शरद साळवी, पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, माजी शाखाप्रमुख राजेंद्र साळवी, बाळकृष्ण गोणबरे आदी उपस्थित होते.