डॉ. रामेश्र्वर सोळंके : खरे ढेरे महाविद्यालयात इंग्रजीवर व्याख्यान
गुहागर, ता. 15 : स्थानिक स्तरापासून वैश्विक स्तरापर्यंत इंग्रजी ही व्यावहारिक भाषा आहे. English Worldwide language रोजगाराच्या विविध संधी निर्माण करणारी ही भाषा आहे. असे प्रतिपादन प्रा.डॉ.सोळंके यांनी केले. ते Spoken English Knocks Your Door या विषयावर बोलत होते.
शहरातील खरे ढेरे भोसले महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी Spoken English Knocks Your Door या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. रामेश्र्वर सोळंके यांनी आपल्या व्याख्यान्यातून विद्यार्थ्यांमधील इंग्रजीचा भयगंड घालविण्याचा प्रयत्न केला.
ते म्हणाले की, इंग्रजी ही खूप लवचिक भाषा आहे. काळाच्या प्रवाहात इंग्रजी भाषेची उत्तरोत्तर प्रगती होण्याचे कारण तिची लवचिकता आहे. इंग्रजी भाषा ही ज्ञानाचे भांडार आहे. आपल्याला स्थानिक ते वैश्विक पातळीपर्यंतच्या (Local To Global) घडामोडी या भाषेमुळे समजतात. जेव्हा इंग्रजी भाषा आपल्या जिव्हाळयाचा, आपुलकीचा, नात्यांचा आणि संवादाचा भाग बनतो, तेव्हा त्याविषयीची भिती आपोआप निघून जाते. आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो. आपल्या यशात तो महत्त्वाचा असतो.English Worldwide language
इंग्रजी भाषेविषयी आपल्याला जवळीकता वाटण्यासाठी शब्दसंग्रह वाढविला पाहिजे. त्यासाठी दररोज पंधरा मिनिटे, भाषा शिकण्यासाठी द्यावीत. त्यात वर्तमानपत्रांचे मोठ्याने वाचन, बी.बी.सी. वर्ड न्यूज ऐकणे, नवीन शब्द शब्दसंग्रहालयात पाहणे, चित्रपट, फॅशन, आर्ट आदी नियतकालिकांमध्ये इंग्रजी भाषेचा साहित्यिक वापर अभ्यासात यतो. त्यातून इंग्रजीमधील नवनवीन ट्रेंड्स, शब्द कसे वापरावेत याची माहिती मिळते. English Worldwide language
सरावासाठी व्हॉटसॲप, फेसबूक सारख्या माध्यमांचा आपण सहज वापर करु शकतो.
माध्यमांवरील संदेश तसेच पुढे पाठवण्यापेक्षा ते संदेश इंग्रजीत बदलून मित्रांना पाठवावेत. आपल्या मित्र-मैत्रिणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, सण-उत्सवानिमित्तच्या शुभेच्छा आणि इतर प्रकारच्या शुभेच्छा विद्यार्थांनी स्वतः इंग्रजीत लिहाव्यात. त्यामुळे त्यांचा लिखाण कौशल्य विकसित होण्यास मदत होते. तसेच आजच्या काळातील नवीन स्ट्रीमिंग व्यासपीठ जसे की नेटफ्लीक्स,अमाझोन प्राइम व्हिडिओ, डीसनी, हॉटस्टार, यु-ट्युब इत्यादी वापर विद्यार्थांनी शैक्षणिक दृष्टीकोनातून आपली भाषा विकसित करण्यासाठी करावा. English Worldwide language
व्याख्यानाच्या शेवटी विद्यार्थांनी विचारलेल्या इंग्रजी भाषेविषयीच्या अनेक प्रश्नांचे निरसन करून त्यांनी आपल्या व्याख्यानाची सांगता केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देशपांडे यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा.कटरे सर यांनी केले. याप्रसंगी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.English Worldwide language