• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आमदार जाधव देणार गुहागरसाठी रुग्णवाहिका

by Mayuresh Patnakar
September 22, 2020
in Old News
16 0
0
आमदार जाधव देणार गुहागरसाठी रुग्णवाहिका
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शहरप्रमुख नीलेश मोरे, पेट्रोलपंपासाठी सह्यांची मोहिम उघडणार

गुहागर ता. 22 : कोरोनाच्या संकटातही तालुका प्रशासनाला एकाच रुग्णवाहिकेवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे कोरोनारुग्णांची गैरसोय होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून अन्य रुग्णवाहिकेची व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या आमदार निधीतून गुहागर तालुक्यासाठी रुग्णवाहिका दिली आहे. पुढील आठवडाभरात त्याचा लोकार्पण सोहळा होईल. अशी माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख नीलेश मोरे यांनी दिली.
नीलेश मोरे म्हणाले की, आज गुहागर तालुक्यात 108 रुग्णवाहिका कोविडसाठी कार्यरत आहे. मात्र या रुग्णवाहिकेवर आरोग्य अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. लोकांनी फोन करुनही रुग्णवाहिका वेळेवर येत नाही. संपूर्ण तालुक्यासाठी एक रुग्णवाहिका अपुरी पडत आहे. मार्च महिन्यापासून रुग्णवाहिकेची मागणी तालुका प्रशासन करत आहे. मात्र सहा महिने उलटून गेले तरी रुग्णवाहिका मिळालेली नाही. या विषयात आमदार जाधव यांनी लक्ष घातले. आमदार निधीतून निधी दिला. रुग्णवाहिका खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता आठवडाभरात रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा होईल.
नगरपंचायतीचे माजी बांधकाम सभापती दिपक कनगुटकर म्हणाले की, मोडकाआगर पुल आणि शृंगारतळी रस्त्याबाबतही यावेळी चर्चा झाली. मोडकाआगर पुलाचे काम तातडीने पूर्ण व्हावे. आणि शृंगारतळीपासून मोडकाआगर पुलाला जोडणारा रस्ता प्राधान्याने पूर्ण व्हावा. त्यानंतरच गुहागर मोडकाआगर रस्त्याच्या कामाला ठेकेदाराने सुरवात करावी. अशी मागणी आमदार जाधव यांच्याकडे आम्ही केली आहे.
पेट्रोलपंपाबाबतही आमदार भास्कर जाधव यांच्याकडे चर्चा केली. मात्र सी व्ह्यु गॅलरी आणि जेटीच्या कामाला गुहागरकरांनीच विरोध केला. तेव्हा पेट्रोलपंपाची ही अशीच गत होवू शकते. त्यामुळे गुहागरकरांना खरच पेट्रोलपंप हवाय का ते विचारुन घ्या. शहरवासीयांची मागणी असेल तरच आपण पुढे जाऊया. अशा प्रकारचे आम. जाधवांनी आम्हाला सुनावले. असे ही यावेळी नीलेश मोरे व दीपक कनगुटकर यांनी सांगितले.
परंतु गुहागरसाठी पेट्रोलपंप आवश्यक आहे. तालुक्यात अन्यत्र पेट्रोलपंप झाले. मात्र गुहागर शहरात पेट्रोलपंप झालेला नाही. ही उणीव दुर करण्यासाठी आमदार भास्कर जाधव फार पुर्वीपासून प्रयत्न करत होते. परिवहन मंत्री, एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांच्याकडेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. त्यामुळे हा विषय चटकन मार्गी लागू शकतो. त्यामुळे गुहागर शहर शिवसेनेतर्फे आम्ही सह्यांची मोहिम राबविणार आहोत. अशी माहिती शहरप्रमुख नीलेश मोरे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला नगरपंचायत सभापती  नीलिमा गुरव, युवासेनेचे उपजिल्हाधिकारी सचिन जाधव, तालुका अधिकारी अमरदीप परचुरे, शहर अधिकारी राकेश साखरकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रदीप सुर्वे,  शिव वाहतूक सेना शहर संघटक सुरज सुर्वे,  सिद्धीविनायक जाधव, सारिका कनगुटकर, विनायक बारटक्के, प्रवीण रहाटे, दिलीप गुरव, बाबू गुहागरकर, समील कनगुटकर, कल्पेश बागकर, वीरेश बागकर, आदी उपस्थित होते.

Tags: AmbulanceBreaking News GuhagarGuhagar NewsGuhagar Shringartali RoadGuhagar Vijapur National HighwayLatest NewsMarathi NewsModkaagar BridgeNews in GuhagarPetrol Pumpगुहागर न्युजगुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गगुहागर शृंगारतळी रस्ताटॉप न्युजताज्या बातम्यापेट्रोलपंपब्रेकिंग न्युजमराठी बातम्यामोडकाआगरचा पुलरस्ता रुंदीकरणरुग्णवाहिकालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.