• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोरोनाच्या रोखण्यासाठी माझे कुटुंब… मोहिम आवश्यक

by Guhagar News
September 21, 2020
in Old News
16 0
0
Rajesh-Tope-At-Pune
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आरोग्यमंत्री राजेश टोपे; तपासणीला घरी येणाऱ्या स्वयंसेवकांना सहकार्य करा

(जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या सौजन्याने)

पुणे : प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्याचे काम ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे शक्य होणार आहे. त्यातून कोरोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होईल. पूर्वनिदान झाले संभावित रुग्णाला उपचार देणे, त्याच्यापासून इतर होणारांना संसर्ग रोखणे शक्य होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृत्यूचे प्रमाणही कमी होईल. त्यामुळे आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे. असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
बाणेर येथील युतिका सोसायटीमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे सहभागी झाले होते. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेल्या या योजनेला यश मिळण्यासाठी सर्वांचा प्रतिसाद महत्वाचा ठरणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स्वंयशिस्त महत्त्वाची आहे. स्वंयशिस्त पाळली तर आपण कोरोनाला रोखू शकतो.  कोरोनाशी लढण्यापेक्षा कोरोना होवूच नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज आहे. रोगप्रतिकारशक्ती चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यावी. प्रत्येकाने स्वत: सोबत इतरांच्याही आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. पुणे महानगरातील युतिकासारख्या सोसायट्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी  पुढाकार घेतला ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
युतिका सोसायटीच्या प्रतिमा येवलेकर यांनी सोसायटीने हाती घेतलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, डॉ. सुभाष साळुंखे, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त नितीन उदास, सहाय्यक आयुक्त जयदीप पवार, आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश डमाळे, नगरसेविका ज्योतीताई कळमकर, बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: Breaking News GuhagarCoronaCorona NewsGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarकोरोनाकोरोना बातम्यागुहागर न्युजटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामाझे कुटुंब माझी जबाबदारीलेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.