शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड; या परीक्षा नियमित पद्धतीने होणार
मुंबई, ता. 16 : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून ही परीक्षा नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाच्या तयारीला लागावे लागणार आहे. Education Minister Varsha Gaikwad has announced the dates for SSC and HSC examinations, which will be conducted offline through regular assessment. Therefore, students will now have to prepare for the exam. The SSC examinations will be held between 15th March 2022 to 18th April 2022. In addition, the written exams for HSC will be held from March 4 to April 7, 2022. The result of 12th class till the second week of June 2022 and so on. An attempt will be made to announce the results of 10th standard by the second week of July 2022. (Announcement of SSC, HSC examinations)
सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आम्ही जाहीर करत आहोत. दहावीच्या परीक्षा या 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 दरम्यान पार पडणार आहेत. त्याचसोबत बारावीच्या लेखी परीक्षा या 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान पार पडणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन या परीक्षा नियमित पद्धतीने होणार. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक, पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला असल्याचे वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी स्पष्ट केले. (Announcement of SSC, HSC examinations)
कधी होणार परिक्षा
दहावी, बारावीच्या आऊट ऑफ टर्न परीक्षार्थींसाठी प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान ऑनलाईन परीक्षा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या (१०वी) परीक्षा घेण्यात येतील. इ.१२ वी च्या लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान होतील. तर, इ. १० वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत प्रचलित पद्धतीने (ऑफलाईन) होतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे. उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील. (Announcement of SSC, HSC examinations)
या परिक्षांचे साधारण वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.
कधी लागणार निकाल
इ.१२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इ. १० वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. The result of 12th class till the second week of June 2022 and so on. We will try to announce the result of 10th standard by the second week of July 2022. All examinations will be conducted only by strict adherence to the Corona Prevention Rules. This was stated by Education Minister Varsha Gaikwad. (Result of HSC & SSC 2022)