रत्नागिरी : राज्यात कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे साथरोग कायदा, 1897 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरु आहे. शासन, महसूल व वन विभागाकडील संदर्भ क्र. 9 अन्वये कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत व करावयाच्या उपाययोजनेबाबत दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य सरकारने आता विविध आस्थापना पुन्हा सुरु करण्याची आणि काम करण्याची परवानगी दिली आहे. तथापि, कोव्हीड-19 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वेळेचे नियमन व नियमांचे काटेकोर पालन, नागरीकांची पुर्ण लसीकरण करण्याची आवश्यकता, व्यापारावर निर्बंध इत्यादी निर्बंध लादण्यात आले आहेत.
आगामी सण हंगामाच्या पार्श्वभूमीवर दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल इत्यादी विविध आस्थापनांच्या कामाच्या वेळेवरील निर्बंधामुळे, कमी कालावधीत अधिक गर्दी होत आहे. ज्यामध्ये त्यांना सध्या काम करण्याची परवानगी आहे. साथरोग अधिनियम 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम,2020 तसेच उपोदघातातील अ.क्र.9 च्या आदेशान्वये प्राप्त अधिकारातून डॉ.बी.एन.पाटील, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी रत्नागिरी जिल्हयातील सर्व रेस्टॉरंटस् आणि भोजनालये मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील आणि इतर सर्व आस्थापना ज्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्या रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास या आदेशाद्वारे परवानगी दिली आहे.
आदेशाचे उल्लघंन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील असे आदेशात म्हटले आहे.