• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बेरोजगारांना हवी रिफायनरी, राजकीय पदाधिकारी सावध

by Mayuresh Patnakar
September 8, 2020
in Old News
16 0
0
RRPL
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 7 : रत्नागिरी रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल्स हा प्रकल्प राजापूर तालुक्यातून पुन्हा एकदा गुहागरला आणण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. बेरोजगार तरुण रिफायनरीला अनुकुल आहेत तर सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता सावध भूमिका घेतली आहे.
रत्नागिरी रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल्स प्रकल्प राजापुरात होणार नाही हे नक्की असून कंपनीची अनुकुलता असेल आणि स्थानिकांची मागणी असेल तर हा प्रकल्प गुहागरमध्ये झाला तरी चालेल अशी भूमिका खासदार विनायक राऊत यांनी घेतली. त्यानंतर गुहागरमध्ये या प्रकल्पाबाबत चर्चा सुरु झाली.
तालुक्यातील तरुणांना वाटते की प्रकल्प गुहागरमध्ये आला तर येथील रोजगार वाढेल. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारा ओंकार वर्धमान म्हणतो की, इंटरनेटवरुन मिळालेल्या माहितीनुसार ही देशातील सर्वात मोठी ग्रीन रिफायनरी आहे. म्हणजे प्रदुषणाची जागतिक मानांकने येथे पाळली जातील. मग अशा प्रकल्पामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळणार असेल तर विरोध का करायचा. शास्त्र (रसायनशास्त्र) शाखेतून पदवीधर झालेला दाभोळचा प्रविण सावंत म्हणतो की, रत्नागिरी रिफायनरीमुळे येथील रोजगार आणि उद्योगांना चालना मिळणार आहे. आज शास्त्र शाखेचा पदवीधर असून मला इस्त्रीचे दुकान चालवावे लागते. जर हा प्रकल्प आला तर माझ्या शिक्षणाचा मला फायदा होईल.
मात्र राजकीय पदाधिकाऱ्यांची सावध भुमिका आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे म्हणाले की, आज सत्तेत असलेल्या पक्षांनी याबाबत निर्णय घ्यायचा आहे. केवळ माध्यमांमधुन येणाऱ्या बातम्यावरुन मी रिफायनरीबाबत बोलु शकत नाही. शिवसेनेच तालुकाप्रमुख म्हणाले की, राजापुरमध्ये रिफायनरीबाबत पक्षाची असलेली भुमिका सर्वांनाच माहिती आहे. उद्या गुहागरमध्ये प्रकल्प येणार असेल तर आम्हाला आधी विचारले जाईल. त्यावेळी सर्वांशी चर्चा करुन आमची मते पक्षाकडे मांडू.
रत्नागिरी रिफायनरी म्हणजे  ज्या प्रकल्पाची चर्चा नाणार प्रकल्प म्हणून होते हा प्रकल्प सुरवातीला गुहागर तालुक्यातील भातगांव, तवसाळ पट्ट्यात होणार होता. याचे सुतोवाच तत्कालिन खासदार अनंत गीते यांनी केले होते. तेव्हा या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला. मात्र तांत्रिक कारणांमुळे या प्रकल्पासाठी राजापुर तालुका निवडण्यात आला.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNanar RefinaryNews in GuhagarRefinery ProjectRRPLटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.