• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वाढीव वीज बिले रद्द करा – मनसेचे निवेदन

by Ganesh Dhanawade
September 2, 2020
in Old News
17 1
2
MNS Guhagar Nivedan
34
SHARES
98
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा

2.9.2020
गुहागर : तालुक्यातील वीज ग्राहकांना पाठवलेली भरमसाठ वीज बिले रद्द करावीत. असे  निवेदन गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महावितरणला दिले. यावर योग्य ती कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे.
पक्ष प्रमुख राजसाहेब  ठाकरे यांच्या आदेशाने,  मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर आणि प्रदेश उपाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या नेतृत्वाखाली गुहागर महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले. शासनाने दिलेल्या आदेशांची पायमल्‍ली करून,  मनमानीपणे महावितरणने वाढीव वीज बिले ग्राहकांना दिली आहेत. कोरोना संकटामुळे देश लॉकडाऊन करण्यात आला. जनतेचा रोजगार बुडाला. अशावेळी वाढीव बिले देवून आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महावितरण करत आहे. ही बिले रद्द करावीत. याबाबत महावितरणकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल. असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी वाहतूक गुहागर सचिव विनायक दणदणे, सह संपर्क अध्यक्ष नितिन कारकर, माजी तालुका अध्यक्ष राजेश शेटे, संतोष खांबे, कौस्तुभ कोपरकर, आदित्य मुकनाक आदी उपस्थित होते.

Tags: Electiricity BillsGuhagarGuhagar NewsLatest NewsMahavitaranMarathi NewsMNSNews in Guhagarताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.