रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी आणि परिसरातील भागामध्ये अनेक पर्यटन स्थळे असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल असते. त्यामुळे शासन आणि स्थानिक लॉक सुद्धा या स्थळांच्या सुशोभीकरणावर जास्त प्रमाणात भर देत असतात. सध्या रत्नागिरीमध्ये मालवण, गोवा सारखे वॉटर स्पोर्ट्स देखील सुरु करण्यात आले आहेत. विविध प्रकारचे शाकाहारी, मांसाहारी, मत्साहारी खाद्य पदार्थांची चंगळ असल्याने कोकणाला पर्यटकांची पहिली पसंती.
कोकणामध्ये येण्यासाठी रेल्वे किंवा खाजगी वाहतुकीद्वारे म्हणजेच रोडवे ने पर्यटक येतात. परंतु, आता कोकणासाठी विशेषतः रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे या पर्यटन स्थळासाठी एक आनंदाची बातमी समजली आहे. उडे देश का आम आदमी या मोहिमेअंतर्गत दिल्ली, गुजरात, आसाम, तेलंगणा, आंध्र आणि महाराष्ट्र अशा राज्यांसोबत काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांना जोडण्यासाठी सी-प्लेन सेवा सुरू करण्यात येणार आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे या पर्यटनस्थळाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर या विकसनशील प्रकल्पामध्ये गणपतीपुळे जोडले जाणार आहे.