गुहागर पोलिसांची चमकदार कामगिरी
गुहागर : तालुक्यातील रानवी येथे इंटरनेट कनेक्शन टाकण्यासाठी ठेवण्यात आलेले 8 लाख 54 हजार रुपये किमतीचे 155 पोल चोरीला गेल्याची घटना घडली होती. या चोरी प्रकरणी गुहागर पोलीसांनी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वस्थरातून कौतुक होत आहे.
The incident took place at Ranvi in the taluka where 155 poles worth Rs 8 lakh 54 thousand were stolen. Guhagar police have arrested four people in connection with the theft. This performance of the police is being appreciated from all quarters.
गुहागर तालुक्यातील रानवी येथील हिंदुस्थान रीसॉर्ट येथून महिनाभरापूर्वी इंटरनेट कनेक्शन टाकण्यासाठी 155 पोल टाकण्यात आले होते. सुमारे 8 लाख 54 हजार रुपये किमतीचे हे पोल होते. हे पोल चोरीला गेल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास करताना गुहागर पोलिसांनी सापळा रचून या चार आरोपींना चोरी करण्यासाठी आले असता संगमेश्वर तालुक्यातील एका ठिकाणी पकडले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कदम व त्यांच्या टीमला हे चोर पुन्हा चोरी करण्यासाठी येत असल्याची तपासादरम्यान मिळाली त्याच वेळी गुहागर पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कदम व यांच्या सहकार्याने त्याच रात्री संगमेश्वर येथे जाऊन या चार चोरांना पकडण्यात यश आले. या कारवाईत गुहागर पोलिस स्थानकाचे राजू कांबळे, वैभव चौगले, विद्याधर नारकर, स्वप्निल शिवलकर, शैलेश वणगे, प्रथमेश कदम, सचिन पाटील, वैभव ओहोळ, प्रतीक रहाटे, विजय चव्हाण यांचा समावेश होतो.