जिल्हा परिषदेच्या सदस्या नेत्रा ठाकुर यांची मागणी
गुहागर : आरोग्य विभाग मार्फत सद्यस्थितीत कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम गावोगावी अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे. गुहागर तालुक्यातील मच्छिमार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा मासेमारीसाठी समुद्रात जाणार असल्याने हे मच्छिमार लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांच्यासाठी प्राधान्याने विशेष लसीकरण मोहिम राबवावी, अशा मागणीचे निवेदन वेळणेश्वर जि. प. गटाच्या सदस्या नेत्रा ठाकूर यांनी जि. प. उपाध्यक्ष उदय बने यांना दिले आहे.
The Corona Virus Prevention Vaccination Campaign is currently being implemented effectively in villages through the Department of Health. As the fishermen of Guhagar taluka will go back to the sea for fishing in the first week of August, a special vaccination campaign should be carried out for them so that they are not deprived of vaccination. W. Netra Thakur, a member of the group. W. Vice President Uday Bane.
शासनाच्या नियमानुसार तालुक्यातील मच्छिमाराचा मासेमारी व्यवसाय बंद आहे. परंतु, १५ ऑगस्ट नंतर मासेमारीची बंदी उठल्यानंतर ते मासेमारीसाठी पुन्हा समुद्रात जाणे क्रमप्राप्त आहे. काही मच्छिमार बांधवांना पहिला डोस मिळालेला नाही. कोरोना लसीकरणाच्या दोन डोसमधील कालावधी ८४ दिवसांचा असल्याने त्यापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. तसेच मासेमारीची बंदी उठल्यानंतर मच्छिमार बांधवाना साधारणतः ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा मासेमारीसाठी समुद्रात व बाहेरगावी जाणार असतात. या मच्छिमार बांधवाचे लसीकरण करण्यासाठी प्राधान्याने विशेष लसीकरण मोहिम राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.