बळीराज सेनेचा ठाम निर्धार..!
आबलोली, संदेश कदम
गुहागर, ता. 03 : बळीराज सेनेची कोर कमिटीची महत्वाची बैठक गुहागर तालुक्यातील वरवेली येथे मनोहर घुमे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी गुहागर तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसा ठाम निर्धार बळीराज सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. Will contest elections in Guhagar on their own

दरम्यान मनोहर घुमे यांचे अध्यक्षस्थानी पार पडलेल्या या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. गुहागर तालुक्यात बळीराज सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी 20 कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत, असे जाहीर करून गुहागर विधानसभा मतदार संघातील अनेक तरुण कार्यकर्ते यांना रोजगार निर्मिती करून देण्यात येईल, असे मनोहर घुमे यांनी सांगितले. Will contest elections in Guhagar on their own
यावेळी जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे, गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख शरद बोबले, तालुका संपर्क प्रमुख संतोष निवाते यांचेसह संपर्क प्रमुख मनोहर घुमे, प्रशांत भेकरे, अमित काताळे, तालुका प्रमुख अरुण भुवड, तालुका सचिव ऍडव्होकेट दिनेश कदम, नवनिर्वाचित युवक तालुका अध्यक्ष विवेक जांगली, विभाग प्रमुख अशोक रावणंग, वरवेली शाखा प्रमुख नामदेव अवेरे, नवनिर्वाचित महिला तालुका अध्यक्ष सौ. श्रावणी शिंदे आदी. कार्यकर्ते उपस्थितीत होते. Will contest elections in Guhagar on their own
