• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकण एलएनजीचे बंदर ऑल वेदर पोर्ट

by Mayuresh Patnakar
June 23, 2025
in Bharat
204 2
0
KLNG port is now All-weather port

KLNG port is now All-weather port

400
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदिपकुमार गुप्ता : भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

गुहागर, ता. 23 : KLNG गॅस टर्मिटलमधील बंदर आता All-weather Port म्हणून जाहीर करण्यात आले.  या बंदरातील ब्रेक वॉटर वॉलचे काम पूर्ण झाले असून जुन महिन्यात या बंदरावर गेलच्या मालकीचे पहिले जहाज ’GAIL Bhuwan’ मधुन गॅस उतरवून घेण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर आणखी दोन जहाजातून गॅस उतरविण्यात आला. KLNG port is now All-weather port.

KLNG port is now All-weather port

गुहागर तालुक्यातील कोकण एलएनजी टर्मिनलमधील बंदरात महाकाय गॅसवाहू जहाजातील द्रवरुप गॅस उतरविला जातो. गॅस उतरवताना समुद्रातील पाणी संथ राहणे गरजेचे असते. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने  या बंदरातील कामकाज चार महिने बंद रहात असे. ही समस्या सोडविण्यासाठी खोल समुद्रात ब्रेक वॉटर वॉल बांधण्याचे काम गेली 4 वर्ष सुरु होते. या ब्रेक वॉटर वॉलचे काम मे महिन्यात पूर्ण झाले. त्यामुळे गेल इंडिया लिमिटेड (GAIL)च्या कोकण एलएनजी टर्मिनलच्या बंदरात 6 जूनला पावसाळ्यातील पहिले गॅसवाहु जहाज आले. या जहाजातील द्रवरुप नैसर्गिक वायु बंदरावर उतरवून घेण्यात यश आले.  यावेळी GAILचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संदीप कुमार गुप्ता, संचालक संजय कुमार उपस्थित होते. KLNG port is now All-weather port

Gail Bhuvan LNG Vessel
Gail Bhuvan LNG Vessel on KLNG port is now All-weather port

त्यानंतर दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत संदीप कुमार गुप्ता यांनी KLNG port is now All-weather port असल्याची घोषणा केली. या पत्रकार परिषदे ते म्हणाले की, ही घटना कोकण एलएजी टर्मिनलसाठी ऐतिहासीक आहे. आता या प्रकल्पात वर्षभर अखंड सेवा देण्याऱ्या युगाची सुरुवात झाली आहे. पावसाळ्यातील समुद्राच्या उंच लाटांपासून जहाजाचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेल्या ब्रेक वॉटर वॉलमुळे हे शक्य झाले आहे. ही ब्रेकवॉटर ‘आयलंड स्ट्रक्चर’ असून ती थेट किनाऱ्याला जोडलेली नाही. ही रचना प्रगत समुद्री अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. KLNG port is now All-weather port

बंगळूर आणि पनवेलपर्यंत पाइपलाइनद्वारे गॅसची वहातूक करण्यामध्ये KLNG Terminal ची महत्त्वाची भूमिका राहीली आहे. भारतातील विविध भागात पाइपलाइनद्वारl LNG पोचविण्याची क्षमता आणि वेग आता वाढणार आहे.  या टर्मिनलची गॅस उतरवून घेण्याची क्षमता आजपर्यत ५ दशलक्ष मेट्रिक टन (mmtpa) इतकी होती. आता पुढील तीन वर्षात ही क्षमता 6.3 दशलक्ष मेट्रिक टनपर्यंत वाढविण्याचे आमचे लक्ष्य आहे. ही प्रगती केवळ कोकण एलएनजी आणि गेलसाठीच  नव्हे, तर भारताच्या ऊर्जा सुरक्षेमधील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. KLNG port is now All-weather port

Tags: GailGuhagarGuhagar NewsKLNGKLNG port is now All-weather portLatest NewsMarathi NewsNews in Guhagarगॅसटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share160SendTweet100
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.