विद्यार्थ्यांचा आदर्शवत उपक्रम
गुहागर : आपल्या आईवडिलांनी पॉकेट मनीसाठी दिलेले पैशांचा योग्य विनियोग करून गुहागरमधील इयत्ता अकरावीच्या समविचारी विद्यार्थ्यांनी शिवाज्ञा फाउंडेशनच्या माध्यमातून गुहागर ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमधील रुग्णांना फळ वाटप आणि फ्रन्ट लाईन वाॅरीयर्स यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. सामाजिक कार्यात खरीचा वाटा उचळणाऱ्या या विद्यार्थ्यांचे सर्वस्थरातून कौतुक होत आहे.
Through Shivadnyaa Foundation, fruits were distributed to the patients of Covid Center at Guhagar Rural Hospital and masks and sanitizers were distributed to the front line warriors. These students who have made a real contribution in social work are being appreciated from all quarters.
६ जून २०१७ शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून श्रीदेव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरच्या इयत्ता अकरावीमधील विद्यार्थ्यांनी शिवाज्ञा फाउंडेशनची स्थापना केली. स्वतः कमावते नसले तरी आईवडिलांनी दिलेल्या स्वखर्चात बचत करून हे विद्यार्थी सामाजिक आणि शैक्षणिक काम करत आहेत. याआधी त्यांनी केरळ, सांगली, कोल्हापूर येथे आलेल्या पूरग्रस्त नागरिकांना आर्थिक साह्य केले होते. तसेच शैक्षणिक साहित्य वाटप, मुख्यमंत्री व पंतप्रधान निधीमध्ये आर्थिक मदत केली आहे.
सद्या गुहागर तालुक्यातील कोरोनाची भयानक स्थिती पाहून गुहागर ग्रामीण रुग्णालयातील कोविड रुग्णांना फळ वाटप केले. तसेच येथील डॉक्टर, परिचारिका यांना मास्क व सॅनिटायझर भेट दिली. या शिवाज्ञा फाउंडेशनमध्ये ओम गंगावणे, साईराज सुर्वे, निरंजन पाकळे, संघराज जाधव, आदित्य शिरधनकर, नेहा पालशेतकर, सुश्मिता मोरे, स्नेहा मालप, अक्षता जोशी, नेहा घाडे, निकीता चव्हाण, श्रद्धा शिर्के, दिव्या माडगे आदींचा समावेश आहे.