गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्थावर अंत्यसंस्कार करणाऱ्या गुहागर नगरपंचायतीच्या कोविड योद्ध्यांचा गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ़े प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
On the occasion of the birthday of Amit Thackeray, a young leader of MNS, Guhagar Taluka Maharashtra Navnirman Sena honored the Covid warriors of Guhagar Nagar Panchayat who were cremated on the coronagrastha who died during the Corona period.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य, पोलीस व महसूल प्रशासनासोबत गुहागर नगरपंचायतीचे कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. दुसऱ्या लाटेत गुहागर ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये तालुक्यातील अनेक कोरोना बधितांचा मृत्यू होत आहेत. एकाच वेळी 4 ते 5 जणांवर रात्री अपरात्री नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना जीवाची पर्वा न करता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. कधीकधी या कर्मचाऱ्यांना दिवसरात्र झोप सुद्धा मिळत नसल्याचे समोर आले आहे. असे कोविड योद्धे गणेश पावसकर, संतोष कोकरे, मनोज घाडे, महेंद्र कदम, प्रतीक चव्हाण, अक्षय लोखंडे, संजय गावडे, मनोज सुर्वे, समर्थ भोसले आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी या कर्मचाऱ्यांना माजी तालुकाध्यक्ष राजेश शेटे यांच्या निवासस्थानी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी मनसेचे माजी तालुका अध्यक्ष राजेश शेटे, तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर, दिनेश निवाते , संजय भुवड, संकेत खांबे, अखिलेश गुप्ता, सौ. निशा राजेश शेटे, नक्षत्रा राजेश शेटे आदी उपस्थित होते.