• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोली बाजारपेठ सोमवार पर्यंत पूर्णपणे बंद

by Ganesh Dhanawade
April 15, 2021
in Old News
17 0
0
आबलोली बाजारपेठ सोमवार पर्यंत पूर्णपणे बंद
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ

गुहागर : तालुक्यातील गजबजलेली आणि परीसरातील सुमारे २५ गावांसाठी मध्यवर्ती असलेली आबलोली बाजारपेठ सोमवार दि.१९ एप्रिल २०२१  पर्यंत पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेले काही दिवस तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक रितीने वाढत आहे. आबलोली बाजारपेठेत दवाखाना, बॅंक, पतसंस्था, पोस्ट, महावितरण, शाळा, महाविद्यालय आदी कामांसह बाजारहाट करण्यासाठी परीसरातील सुमारे २५ गावातील लोकांची ये-जा असते. योग्य पद्धतीने मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे आदींबाबत ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सुचना देण्यात येत आहेत मात्र कोरोना चाचणीच्या मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आबलोली बाजारपेठ परीसरात कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यात काही व्यापारी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून दुपारपर्यंत फक्त औषधांची दुकाने उघडी राहणार आहेत. तसेच खाजगी वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सोमवारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार असून त्यानंतर परीस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. बाजारपेठ सुरू झाली तरी फक्त अत्यावश्यक सेवा पुरविणारीच दुकाने उघडली जातील तसेच त्यांच्या जवळ कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक आहे. – महेश भाटकर – पोलीस पाटील, आबलोली

Tags: Coronacorona warriorsCovid Care CentreCovid19GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarकोरोनाकोरोना बातम्याकोरोना महामारीटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.