पर्यावरण संतुलनसाठी वृक्ष लागवड आवश्यक – सचिन बाईत
गुहागर, ता. 29 : निर्मल ग्रामपंचायत आबलोली व सचिनदादा बाईत युवामंच यांच्या संयुक्त विद्यमाने आबलोली येथे सुमारे सात हजार वृक्षांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संतुलन, वृक्ष लागवड व याबाबतची भावी पिढीमध्ये आवड व रुची निर्माण व्हावी या उद्देशाने हावअभिनव उपक्रम राबविला आला. यावेळी प्रत्येकाने झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी पार पडली पाहिजे, असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख श्री. सचिन बाईत यांनी ग्रामस्थांना केले. Distribution of 7000 trees in Aabloli


यावेळी चंद्रकला उद्योग समुहाचे संचालक व शिवसेना तालुका प्रमुख श्री. सचिन बाईत, रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ. स्नेहल बाईत, सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत सदस्य श्री. ऋषिकेश बाईत, सौ. शैला पालशेतकर, सौ. गोणबरे, सचिनदादा बाईत युवामंचाचे कु. शुभम बाईत व ग्रामस्थ उपस्थित होते. Distribution of 7000 trees in Aabloli

