• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मोडकाआगरच्या धरणात दुर्गंधीयुक्त गटाराची माती

by Mayuresh Patnakar
January 24, 2021
in Old News
16 1
1
मोडकाआगरच्या धरणात दुर्गंधीयुक्त गटाराची माती
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मनिषा कन्स्ट्रक्शनचे कृत्य, प्लास्टीक कचरादेखील टाकला पाण्यात

गुहागर, ता. 23 : पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोडकाआगरच्या धरणात दुर्गंधीयुक्त, प्लास्टीक कचरायुक्त माती टाकण्यात आली आहे. ठेकेदाराच्या या कृत्याची माहिती मिळतान नगराध्यक्षांनी दोन डंपर अडवले. एका डंपरमधील माती परत पाठवली. टाकलेली माती परत नेण्यास सांगितले. महामार्ग प्राधिकरणचे मराठे यांना ही माहिती सांगितली. मात्र ठेकेदाराच्या मुजोर व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
सध्या मोडकाआगर धरण परिसरात भरावाचे काम सुरु आहे. तर शृंगारतळी परिसरात रस्त्याच्यासाठी खोदाईचे काम सुरु आहे. खोदकामातून काढलेली माती डंपरमध्ये भरुन ती मोडकाआगरच्या धरणात टाकली जात आहे. ही माती नाल्यातील, गटारातील असून दुर्गंधीयुक्त आहे. शिवाय प्लास्टीकच्या पिशव्या, बाटल्या, काचेच्या बाटल्या, तुटलेल्या केबल आदी कचरा या धरणात टाकला जात आहे.
काम गतीने करताना मोडकाआगरच्या धरणात आपण काय टाकतो आहोत याचा विचारही मनिषा कन्स्ट्रक्शनचे इंजिनियअर, सुपरवायझर करत नाहीत. शृंगारतळीमध्ये दोन पुल पाडण्यात आले आहेत. या पुलाखालून सांडपाणी वाहते. श्रृंगारतळीमधील कचरा ज्यामध्ये प्लास्टीक पिशव्या, बाटल्या, खाद्य पदार्थांची वेष्टने, मटण, चिकन सेंटरमधील घाण ही याच पुलाखाली टाकली जाते.  पाणी वहात होते. मनिषा कन्स्टक्शनच्या कामगारांनी पुलाच्या राडारोड्यासहीत ही दुर्गंधीयुक्त माती धरणात भरावासाठी वापरली आहे. शिवाय रस्ते रुंद करताना तोडलेल्या झाडांची मुळे, फांद्या, खोदकाम करताना तोडलेल्या केबल हा कचराही धरणाच्या पाण्यात टाकला आहे.
सदर घाण धरणाच्या पाण्यात टाकली जात असल्याचे समजता गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी तातडीने माती टाकण्याचे काम थांबवले. एक डंपर परत पाठवला. सुपरवाझरला फोन करुन ही माती उचलून नेण्यास सांगितले. मात्र नगराध्यक्षांच्या सुचनांकडे ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी कानाडोळा केला आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता मराठे यांनी शासकीय उत्तर दिले. मराठे म्हणाले की, आम्ही ठेकेदाराला मोडकाआगरच्या धरणातील पाणी दुषित होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. सध्या घडलेला प्रकार नेमका काय आहे ते पाहून तशा सूचना ठेकेदाराला करण्यात येतील.

Tags: Breaking NewsChiplun RoadGuhagarGuhagar NewsGuhagar Vijapur National HighwayLatest NewsLocal NewsMarathi NewsModkaagar BridgeNational HighwayNews in GuhagarTop newsVijapur Highwayगुहागरगुहागर चिपळूण रोडगुहागर न्युजगुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गगुहागर शृंगारतळी रस्ताटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यामुंबई गोवा महामार्गमोडकाआगरचा पुलरस्ता रुंदीकरणराष्ट्रीय महामार्गलेटेस्ट अपटेड्सलोकल न्युजविजापूर महामार्ग
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.