लाकडी साकव प्रमुख आकर्षण; स्पर्धक संघांना नोंदणी करण्याचे आवाहन
गुहागर, ता. 20 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2021 या क्रिक्रेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धा 4 फेब्रुवारी 2021 ते 8 फेब्रुवारी 2021 या कालावधीत मोहल्ला स्टेडियम येथे भरविण्यात येणार आहेत. तरी तालुक्यातील क्रिकेट संघांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन गुलजार क्रिकेट क्लबने केले आहे.
गुलजार क्रिकेट क्लबच्या स्पर्धेचे आकर्षण असते ते साकवाचे. दरवर्षी आयोजकांना मैदानात येण्यासाठी नदीवर लाकडी साकव बांधावा लागतो. सुमारे 35 फुट लांबीचा लाकडी साकव बांधताना आयोजन या साकवाला सजवतात, विद्युत रोषणाईने आकर्षक करतात. त्यामुळे या स्पर्धेची वेगळी ओळख बनली आहे. सायंकाळी नदीच्या प्रवाहात साकवाचे पडणारे प्रतिबिंब मोहक असते. या वर्षीह स्पर्धेसाठी असाच आकर्षक साकव उभारण्यात येणार आहे.
स्पर्धेमध्ये यावर्षी बक्षिसांचा पाऊस पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रु. 11 हजार 111 रुपयांच्या बक्षिसासह चषक देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघाला रोख रु. 7 हजार 777 रुपयांच्या बक्षिसासह आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांची देखील निवड करुन त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या संघांनी 1 फेब्रुवारी 2011 पर्यंत नोंदणी करायची आहे. त्यासाठी रु. 1 हजार प्रवेश फी आहे. संघांनी नाव नोंदणी करण्यासाठी तवक्कल माहिमकर (9637631488), इफ्तिकार भाटकर (8412051445), वसीम झोंबडकर (7083626995), साहिल माहिमकर (9075075873), अल्तमश भाटकर (9881730386), हमझा भाटकर (7218665561) या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन गुलजार क्रिकेट क्लबने केले आहे.
स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघांनी स्पर्धेच्या नियम व अटी काळजीपूर्वक वाचणे गरजे आहे. सहभागी संघांचे सर्व खेळाडू एकाच ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीमधील असावेत. प्रत्येक खेळाडूने येताना ओळखपत्र आणावे. प्रत्येक संघाने वेळेत उपस्थित रहावे. वेळत उपस्थित न राहिल्यास दंड भरावा लागेल. संघाला प्रत्येक सामन्यासाठी मंडळाकडून चेंडू विकत घ्यावा लागेल. स्पर्धा भरविण्यात येणाऱ्या मैदानात नैसर्गिक अडथळे जाहीरक्षेत्र असल्यामुळे निर्णय देण्याचा अधिकार मंडळाकडे राहील. असे काही महत्त्वाचे नियम गुलजार क्रिकेट क्लबच्या स्पर्धेत आहेत. त्याची अधिक माहिती आयोजकांकडून घ्यावी.