गुहागर, ता. 06 : मराठी रंगभुमी दिनानिमित्त शहरातील नाट्यकलाकारांनी (Theater artists) विठ्ठल गोपाळ रंगमंचाचे पुजन करुन रंगभुमीला (Rangbhumi Puja) अभिवादन केले. त्यानंतर सर्वांनी सामुहिक नांदी म्हणून मराठी रंगभुमीसाठी झटणाऱ्या सर्वांना मानवंदना दिली. यावेळी श्री देव कोपरी नारायण प्रासादिक नाट्यमंडळ व कला विकास संस्था गुहागरचे कलाकार उपस्थित होते. Theater artists performed Rangbhumi Puja


Historical Theater
गुहागर शहरातील सर्वात जुना रंगमंच (Historical Theater) म्हणजे वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिराशेजारी असलेला रंगमंच. मराठी रंगभुमीवरील अनेक संगीत नाटकांना (marathiplay) स्वरांकित करणारे पं. गोविंदराव पटवर्धन यांनी या रंगमंचावर अनेक वर्ष संगीत नाटकांना साथ संगत केली. रंगभुमीसाठी (theaterarts) आयुष्य वेचलेल्या पं. गोविंदराव पटवर्धन यांनी वडिलांच्या स्मरणार्थ या रंगमंचाचा 1977 मध्ये जीर्णोध्दार केला. ग्रामस्थांनी या रंगमंचाचे नामकरण विठ्ठल गोपाळ तथा अण्णा पटवर्धन असे केले. या रंगभुमीवर स्वातंत्र्यपूर्व काळापासून नाटकांचे सादरीकरण केले जाते. या नाटकांमध्ये काम करणाऱ्या अनेक मंडळींनी येथे नटेश्र्वराच्या जागृतावस्थेचा अनुभव घेतला आहे.


Theater artists performed Rangbhumi Puja
मराठी रंगभुमी दिनाच्या (Marathi Rangbhumi Day) निमित्ताने शनिवारी (ता. 5) रात्री कोपरी नारायण प्रासादिक नाट्यमंडळ, कलाविकास संस्था गुहागर या संस्थाचे कलाकार, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ विठ्ठल गोपाळ पटवर्धन रंगमंचावर जमले. प्रातिनिधीक स्वरुपात अनेक वर्ष या रंगभुमीवर काम करणाऱ्या सौ. अनुराधा दामले, नेपथ्यामध्ये महत्त्वाची भुमिका निभावणारे संजय सावरकर व रवींद्र दामले, राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचे पारितोषिक मिळवणारे कृपाल परचुरे, विविध नाटकांमध्ये काम करणारे संदीप वैद्य, मनिष खरे, संगीत नाटकांमध्ये गायकांची तयारी करुन घेणारे अरुण परचुरे यांनी रंगभुमीचे पूजन केले. यावेळी वेदमुर्ती मंदार दिक्षित यांनी वेदांमधील पंचमहाभुतांचे स्मरण व स्तुती करणाऱ्या श्र्लोकांचे पठण (Reciting Vedas) केले. त्यानंतर श्री देव कोपरी नारायण मंदिरामध्ये ऑर्गन आणि तबल्याच्या साथीवर सर्वांनी सामुहिक पंचतुंड नररुंड मालधर ही नांदी गाऊन मराठी रंगभुमीला मानवंदना दिली. यावेळी श्री देव कोपरी नारायण देवस्थानचे अध्यक्ष व नगरसेवक समीर घाणेकर, ट्रस्टी महेश दीक्षित, अनिल वैद्य, अमित जोशी, अद्वैत गोखले, चिन्मय सावरकर, प्रकाश तांबे, राधाकृष्ण आरती मंडळाचे सदस्य, माजी सरपंच सौ. विद्या परचुरे यांच्यासह महिला, पुरुष, बाल कलाकार आदी उपस्थित होते.
Click to Read : मराठी रंगभूमी दिन 5 नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो?
Tags : Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, Theater artists, Rangbhumi, Marathi Rangbhumi Day, Reciting Vedas, नाट्यकलाकार, मराठी रंगभुमी दिन, मानवंदना, वेदपठण, theaterarts, marathiplay,