राष्ट्र सेविका समितीने केले होते स्पर्धेचे आयोजन ; 6 संघ सहभागी
गुहागर, ता. 08 : देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेमध्ये राधाकृष्ण महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकावाला. हिरकणी महिला बचत गटाचा द्वितीय तर कात्यायनी महिला मंडळाचा तृतीय क्रमांक आला. राष्ट्र सेविका समितीने या स्पर्धांचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे रविवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत असतानाही या स्पर्धेसाठी गुहागर तालुक्यातील 6 महिलांचे संघ गुहागरमध्ये उपस्थित होते. Patriotic song singing competition

ऑगस्ट क्रांती दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्र सेविका समिति शाखा गुहागरतर्फे महिलांसाठी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा परशुराम सभागृहात ७ ऑगस्टला झाली. स्पर्धेचे उद्घाटन गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी केले. यावेळी व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दूल भावे, राष्ट्र सेविका समितिच्या जिल्हा कार्यवाहिका अपर्णा आठवले आदी मान्यवर उपस्थित होते. गुहागर, वेळंब, मळण येथील एकूण 6 संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम क्रमांक राधाकृष्ण महिला मंडळ, गुहागर यांनी मिळविला. द्वितीय क्रमांक हिरकणी महिला बचत गट, गुहागरने पटकावला. तर कात्यायनी महिला मंडळ, गुहागर यांना तृतीय क्रमांक मिळाला. Patriotic song singing competition


