• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भारत आणि इंग्लंड देशांमध्ये सामंजस्य करार

by Manoj Bavdhankar
July 23, 2022
in Bharat
17 0
0
Agreement between India and England
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थ्यांचे आवागमन वाढविण्यासाठी

मुंबई, ता. 23 :  इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाचे स्थायी सचिव जेम्स बोलर आणि केंद्रीय शिक्षण विभागाचे उच्च शिक्षणविषयक सचिव के.संजय मूर्ती यांनी दोन्ही देशांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेला परस्परांनी मान्यता देण्यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. Agreement between India and England

मे 2021 मध्ये आभासी पद्धतीने झालेल्या भारत (India) आणि इंग्लंड (England) या देशांच्या पंतप्रधानांच्या शिखर परिषदेत दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी एकात्मिक आराखडा 2030 चा स्वीकार करण्यात आला होता. दोन्ही देशांनी नव्या वाढीव व्यापारविषयक भागीदारीला देखील मान्यता दिली. शिक्षण क्षेत्र हा या आराखड्याचा महत्त्वाचा घटक आहे. भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेला परस्पर मान्यता देण्यास मंजुरी देऊन दोन्ही देशांनी शिक्षणक्षेत्र विषयक सहकार्य अधिक वाढविण्याला मान्यता दिली आहे. Agreement between India and England

Agreement between India and England

या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांना एकमेकांच्या देशात अधिक सुलभतेने शिक्षण घेणे शक्य होईल आणि दोन्ही देशांतील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या दरम्यान शैक्षणिक तसेच संशोधनविषयक सहकार्याची कक्षा अधिक रुंदावेल. त्यामुळे आपल्या द्विपक्षीय शैक्षणिक संबंधांच्या बाबतीत हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजला जात आहे. Agreement between India and England

देशाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये अधिक भर देण्यात आलेले शिक्षण क्षेत्राचे आंतरराष्ट्रीयीकरण अधिक सुलभतेने होण्यासाठी भारत सरकार विविध देशांशी मोठ्या प्रमाणात आंतराष्ट्रीय सहकारी संबंध वाढविण्याच्या दृष्टीने अनेक पावले उचलत आहे. Agreement between India and England

Tags: Agreement between India and EnglandGuhagarLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.