गुहागर : राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरदराव पवार साहेबांचे आपण खंदे कार्यकर्ते आहोत. स्वार्थासाठी कुठेही धावणारे कार्यकर्ते आपण नव्हे. आपणही सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाशी व आपल्या नेत्याशी एकनिष्ट राहिलात हा तूमचा स्वाभिमान असून कोण स्वार्थासाठी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेले याला महत्व न देता तुम्ही याहि परिस्थीतीत न डगमगता पक्ष टिकवून ठेवलात एवढी जिद्द तूमच्याकडे आहे. आम्ही तुम्हांला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. राष्ट्रवादी पक्षासोबत तूमचं आमचं नातं विश्र्वासाचं आहे ते कायम टिकून रहाणारच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे गुहागर विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्री. राजेंद्र आंब्रे यांनी केले.
Our relationship with NCP is one of trust and it will last forever, asserted NCP’s Guhagar Assembly constituency president Shri. Performed by Rajendra Ambre.
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था आबलोलीच्या सभागृहात राष्ट्रवादी पक्षाच्या पडवे जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्तांच्या सुसंवाद संपर्क अभियानात ते बोलत होते. आगामी जि. प. व पं. स. आपली सत्ता प्रस्थापित करायची आहे. तेव्हा आताच आपण वाडीवस्तीवर पोहचणे गरजेचे आहे. तुम्ही दिलेल्या विकासकामांना तटकरे साहेबांसह अजितदादा व पवार साहेबांच्या माध्यमातून आपण न्याय मिळवून देऊ. सर्वांंनी व्यापक दृष्टीकोन ठेऊया. आपल्याला जि. प. व पं. स. आणि आमदारही राष्ट्रवादीचाच निवडून आणायचा आहे, असे आवाहन राजेंद्र आंब्रे यांनी केले. या सुसंवाद संपर्क अभियानात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवराम निवाते, प्रमोद गोणबरे, संदिप पाष्टे, गोविंद वेलूंडे, मुरलीधर हातीस्कर, रवी पवार, शशिकांत पवार आदी कार्यकत्यांनी रस्ते, पाणी आदी समस्या मांडल्या. यावर राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष रामचंद्र हुमणे, नगराध्यक्ष राजेश बेंडल, पद्माकर आरेकर, तालूकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रदिप बेंडल, जिल्हा सरचिटणीस विजय मोहिते, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर , दिपक जाधव, पांडूरंग पाते, डॉ. अनिल जोशी, जगदीश गडदे, अरविंद आंब्रे, सुरेश आ़ब्रे, अजिंक्य आंब्रे, बाळू आंब्रे, रोहित चाळके, सुप्रिया साळवी, संतोष मोरे, शशिकांत पवार, जगदिश गडदे, विजय शिवलकर, विभूती मोहिते, संतोष सोलकर, रमेश कुरटे आदी उपस्थित होते.