• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

by Ganesh Dhanawade
July 10, 2021
in Old News
16 0
0
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असला तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्यातील ५ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी दिली.
राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधली पोटनिवडणुकसाठी मतदान होणार होते. मात्र करोनाचं संकट पाहता या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी १९ जुलैला मतदान होणार होतं. मात्र ७ जुलैला राज्य शासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती. ६ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेत राज्य निवडणूक आयोगाने सरकारकडे अहवाल मागितला होता. यात करोनाबाबतची अधिकची माहिती आणि सविस्तर अहवाल मागितला होता. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने पोटनिवडणुका स्थगित केल्या आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकांसाठी असलेली आचारसंहितादेखली शिथिल करण्यात आली आहे.

Tags: CoronaCorona NewsCovid19electionsGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in GuhagarPanchayat SamitiState ElectionState Election CommissionerZilla Parishadकोरोनाकोरोना बातम्याजिल्हा परिषदटॉप न्युजडेल्टा प्लस व्हेरिएंटताज्या बातम्यापंचायत समितीमराठी बातम्याराज्य निवडणूक आयुक्तलोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.