रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या विशेष प्रयत्नातून आज रत्नागिरी जिल्हय़ातील मिनी विधान भवनचे स्वरूप असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीला आज मंजूरी प्राप्त झाली अशी माहीती अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांनी दिली.
या इमारतीसाठी राज्य सरकारकडून अठ्ठावन्न कोटी सत्तावन्न लाख सतरा हजार तीनशे चौदा रुपये मंजूर करून राज्याच्या बजेट मध्ये तरतूद सुध्दा केली. या संदर्भात अध्यक्ष यांनी 26 जून 2021 रोजी जिल्हा परिषद येथे संबंधित अधिकारी वर्गाची बैठक घेतली. या नंतर अधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव तयार करून 30 जून 2021 रोजी ग्रामविकास मंत्रालयात सादर केला. त्यानंतर काही त्रुटी मार्गी लावून 16 सप्टेंबर 2021 रोजी तांत्रिक मान्यता घेण्याकरिता मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य यांच्या कडे सादर करण्यात आले.
लगेचच 28 व 29 सप्टेंबर 2021 रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली. 01 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीने परिपूर्ण व त्रुटींच्या पुर्ततेसह प्रस्ताव सादर केला. 29 नोव्हेंबर 201 रोजी उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन या प्रस्तावाला मंजूर देण्यात आली.
अवघ्या साडेपाच महीन्यात 58 कोटी रुपये जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीसाठी आणण्यात रत्नागिरीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव व पूर्ण जिल्हा परिषदेला यश प्राप्त झाले. यात विशेष करून अध्यक्ष यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यी उध्दव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तत्कालीन मुख्य सचिवा सीताराम खुंटे, ग्राम विकासंत्री हसन मुश्यीफ, राज्य मंत्री अब्दूल सत्तार, आमदार भास्करराव जाधव, आणि जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले व अभिनंदन केले. या नवीन प्रस्तावित इमारतीमध्ये यापूर्वीच्या इमारतीमध्ये नसलेले सद्यस्थितीत आवश्यक असलेले जनरल बाॅडी मिटींग हाॅल, कॅन्टीन, मेंबर्स रूम, महिला कक्ष, विडीओ काॅन्फ्रेंस रूम, पॅट्री, समिती सभागृह, प्रशिक्षण हाॅल, पार्किंग, भोजन कक्ष, अशा संपूर्ण सोयीसुविधा असलेली बेसमेंट, तळ मजला व 6 मजली सुसज्ज इमारत असणार आहे. ही जिल्हा परिषद इमारत उभारणी साठी मान्यता वा निधी मिळवण्याच यश माझे एकट्याचे नसून संपूर्ण जिल्हा वासियांचे आहे आणि म्हणून मी आज अध्यक्ष या नात्याने सर्व माझ्या जिल्हा वासियांचे या यशा करिता मनापासून अभिनंदन करतो. असे उद्गार अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांनी यावेळी काढले.